शिरूर तालुका
जीवनात गुरुना खूप महत्व असुन आयुष्याला आकार देण्यात महत्वाचे योगदान गुरुचे असते असे मत प्रसिध्द उद्योगपती व नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी प्रा विलास आंबेकर यांच्या मानपत्र प्रदान कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले
शिरूर ama9 वृत्तसेवा
जीवनात गुरुना खूप महत्व आहे. आयुष्याला आकार देण्यात महत्वाचे योगदान गुरुचे असते शिक्षण शेत्रात प्रा विलास आंबेकर यांचे योगदान मोठे असुन त्याचा फायदा भविष्यात येणाऱ्या पिढीला झाल्या शिवाय राहणार नाही मत असे प्रसिध्द उद्योगपती व नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक प्रा .विलास बापूराव आंबेकर यांच्या मानपत्र देवून नूकत्याच सन्मान करण्यात आला .यावेळी आमदार ॲड अशोक पवार ,आमदार निलेश लंके , नगराध्यक्षा वैशाली वाखारे , राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम , प्राचार्य डॉ.के सी मोहिते, अर्चना बहेनजी , पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण ,शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार , मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे ,माजी नगराध्यक्षा उज्जवला बरमेचा ,राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना प्रकाश धारिवाल म्हणाले की शिक्षणा शिवाय पर्याय नाही. शिक्षणा तून परिवर्तन होते . आंबेकर परिवार परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असल्याचे ते या वेळी म्हणाले .
आमदार ॲड . अशोक पवार म्हणाले की सामाजिक कार्यात आंबेकर परिवाराचे योगदान मोठे आहे .आपण ज्या पदावर कार्यरत आहोत त्या द्ववारे समाजाचे हित जोपासणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले प्रा.विलास आंबेकर यांनी शहराच्या परिसराच्या विकासासाठी कार्यरत राहावे. परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यारा विद्यार्थ्यान साठी वाचनालयाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले .
यावेळी आमदार निलेश लंके ,माजी प्राचार्य नंदकुमार निकम ,प्राचार्य डॉ. के .सी . मोहिते , जाकिरखान पठाण , नामदेव घावटे आदीची मनोगते झाली .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. विलास आंबेकर यांच्या पगडी, शाल ,पुस्तक देवून सपत्नीक सन्मान करुन मानपत्र प्रदान करण्यात आले .
प्रा .विलास आंबेकर यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षणक्षेत्रात काम करताना अनेक विद्यार्थ्याना घडविण्याची संधी मिळाल्याबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करुन आगामी काळात विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले .
मानपत्राचे वाचन अर्चना बहेनची यांनी केले . प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले .स्वागत शिरुर शहर कॉग्रेस आय चे अध्यक्ष ॲड. किरण आंबेकर यांनी केले . सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी तर आभार सुदाम पवार यांनी मानले .
फोटो ओळी
प्रा विलास आंबेकर यांना मानपत्र प्रदान करताना मान्यवर .



