शिरूर तालुका
कान्हूरच्या प्रथमेश व सायलीला मिळाला कृत्रिम ‘हात व डोळा ‘प्राचार्य अनिल शिंदे यांच्या प्रयत्नांना दिली रोटरीने साथ
शिरूर ama9 वृत्तसेवा
कान्हूरच्या प्रथमेश व सायलीला मिळाला कृत्रिम ‘हात व डोळा ‘प्राचार्य अनिल शिंदे यांच्या प्रयत्नांना दिली रोटरीने साथ
याबाबत माहिती अशी कान्हुर मेसाई येथील
विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलाला कोपरापासून हात नाही आणि मिडगुलवाडी येथे निकाल वाचनाची पालकसभा झाल्यानंतर एका मुलीला जन्मतः डावा डोळा नाही ही बाब विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाईचे प्राचार्य अनिल शिंदे यांच्या लक्षात आली.त्यांनी दोन्ही मुले आणि त्यांच्या पालकांशी संपर्क केला, त्यांना शाळेत बोलाविले तेव्हा इ.६ वीत शिकणाऱ्या प्रथमेश भगवान मिडगूले ह्या विद्यार्थ्यांचा हात कडबाकुट्टी मशीनमध्ये सापडला आणि नंतर तो कोपरापासून कापावा लागला अशी माहिती त्याची आई सविता मिडगूले यांनी दिली,तर सायली सोमनाथ पिंगळे ह्या इ.९ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा डावा डोळा जन्मतः खूप बारीक असून,त्या डोळ्याने तिला काहीच दिसत नाही.कोणतेही डॉक्टरी उपचार केले गेले नाही तिचे वडील सोमनाथ पिंगळे यांनी प्राचार्यांना सांगितले . त्यांची करुण कहाणी ऐकून प्राचार्य अनिल शिंदे यांनी मॅजिक बस फाऊंडेशनचे उमेश साळवी,सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे यांच्याबरोबर, ह्या दोन मुलांची व पालकांची कैफियत मांडली.
रोटरी क्लब ऑफ पुनाडाउनटाऊनचे जितू मेहता,साने गुरुजी आरोग्य केंद्र हडपसरचे अमोल झगडे यांनी ह्या मुलांबाबत प्राचार्य शिंदे यांच्याकडून माहिती घेतली.ह्या मुलांवर मोफत उपचार करण्यासाठी त्यांना पुण्याला घेऊन येण्याविषयी सुचविले.
(शनिवार दि.२५)रोजी प्राचार्य शिंदे हे मुलांसह त्यांच्या पालकांना घेऊन पुण्याला गेले.तेथे डॉ.परीक्षित गोगटे यांनी त्यांच्या नेत्र रुग्णालयात सायली हिचे डोळे तपासले.त्यांनतर तिला डावा कृत्रिम डोळा बसविण्यात आला व चष्मा तिला पुढील आठवड्यात मिळेल असे सांगितले.हे सर्व उपचार डॉ.परीक्षित गोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामोबदला केले.त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचलित हडपसर येथील साने गुरुजी आरोग्य केंद्रात प्रथमेश याला एल एन 4 कृत्रिम हात बसविला गेला.हा हात अमेरिकेतून एल एन मिडोज ह्या संस्थेतून येतो.हा हात वजनाने हलका (४०० ग्रॅम),अत्याधुनिक व वापरण्यास सोपा आहे.ह्या हाताने त्याला दैनंदिन कामे करता येणार आहेत.हा सर्व उपचार विनामोबदला करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर,रोटरी क्लब ऑफ पुनाडाउनटाऊनचे प्रदीप मुनोत,जितू मेहता,अमोल झगडे,हसनमिया,सुनील जिते,सोमनाथ राक्षे,निलेश खर्डे,प्रा.राजेंद्र पठाण उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर नाताळच्या ह्या दिवशी हसू फुलले .
फोटो ओळी महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचलित हडपसर येथील साने गुरुजी आरोग्य केंद्रात प्रथमेश याला एल एन 4 कृत्रिम हात बसविला गेला त्यावेळी उपस्थित डॉक्टर व पदाधिकारी



