कान्हूरच्या विद्यालयात गणित दिनानिमित्त अवतरला ‘सांताक्लॉज – ‘ मुलानमध्ये आनंदोत्सव
शिरूर ama9 वृत्तसेवा जागतिक गणित दिनानिम्मित कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्याख्यान, प्रशमंजुषा,रांगोळी प्रदर्शन ह्या बहुविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गणित हा विषय अवघड नसून तो समजून घेतला तर आनंददायी आहे असे प्रतिपादन प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले.दरम्यान मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन ह्या स्वयंसेवी संस्थेने आनंददायी शिक्षण ह्या उपक्रमात आज विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नाताळच्या पार्श्वभूमीवर आज शाळेमध्ये सांताक्लॉजचे आगमन झाले तेव्हा मुलांनी अत्यन्त आनंदाने त्यांचे स्वागत केले व गाण्याच्या तालावर मुलांनी ठेका धरला.सांताक्लॉजने मुलांना बिस्किटे व खाऊवाटप केले.प्रत्यक्षपणे पहिल्यांदाच सांताक्लॉज पाहून मुले हरखून गेली होती. ह्या कार्यक्रमात अव्हेरी डेनिसन ह्या संस्थेच्या मानव संसाधन विकास प्रमुख भावना लुनीयाल, उत्पादन विभागाचे व्यवस्थापक महेंद्रकुमार,सह व्यवस्थापक सचिन पिसाळ व धनंजय खैरनार,संशोधन अभियंता ऋतुजा भोसले,सोनम चव्हाण हे उपस्थित होते.गणित दिनाचे आयोजन प्रा.अविनाश दौंडकर,श्री.सिताराम मोहिते, प्रा.रोहिणी पुंडे,प्रा.धनंजय तळोले,सुनीता खर्डे,कविता रेटवडे, जयश्री गायकवाड यांनी केले होते,तर मुलांच्या भेटकार्ड प्रदर्शन, शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन ह्या कार्यक्रमाचे आयोजन मॅजिक बस फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक उमेश साळवे,रवींद्र शेळके,किरण इंगळे,राजेंद्र पिंगळे,प्रवीण मिडगूले, किरण गव्हाणे,अविनाश बचे,गणेश पवार,शाहिद नाईक,रोहिणी कोरडे यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी,तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक साहेबराव आंधळे यांनी केले. फोटो ओळी कान्हूरच्या विद्यालयात गणित दिनानिमित्त ‘सांताक्लॉज’ चे आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला .



