शिरूर तालुका

शिरूर शहरातील वर्दळीचा भाग असलेला विद्याधाम प्रशालेसमोरील रस्ता गेल्या तीन महिन्यापासुन खोदुन ठेवला अपघात होण्याची शक्यता – नागरिक त्रस्त ,उपोषणाचा इशारा

शिरुर ama9  वृत्तसेवा 
शिरुर शहरातुन जाणा- या पुणे नगर रस्त्याचे सिमेंटीकरण व दुरुस्तीचे काम सुरु असुन गेल्या तीन महिन्यापासून शहरातील अत्यंत वर्दळीचा  भाग असलेल्या विद्याधाम प्रशाले समोरील रस्ता खोदुन ठेवला असुन  धुळीमुळे तेथील नागरिक व दुकानदार  त्रस्त झाले असुन   लवकरात लवकर काम न झाल्यास उपोषणालचा इशारा काही नागरिकांनी दिला आहे . 
गेल्या तीन महिन्यापासुन हा रस्ता काहीही कारण नसताना खोदुन ठेवला असुन त्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनमुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो तसेच येथे उडणाऱ्या धुळी मुळे अनेकांना श्वसनाचे व खोकल्याचे त्रास होऊ लागले आहे . मात्र या सर्व गोष्टींनकडे ना ठेकेदाराचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम  खात्याच्या अधिकाऱ्यांचे ,ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला . आमदार ॲड अशोक पवार यांच्या संकल्पनेतुन हा रस्ता होत आहे मात्र या गोष्टीला हरताळ फासण्याचे काम ठेकेदार व अधिकारी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे . 
या रस्त्याकडील दुर्लक्षा मुळे दिनांक १ जानेवारी रोजी याठिकाणी मोठा अपघात होता होता राहिला. या रस्त्याच्या कामानिमित्ताने बी.जे कॉर्नर लगत विद्याधाम प्रशाला व स्नेहल झेरॉक्स समोरील पुणे नगर रस्त्याच्या एका भागाचे खोदकाम करण्यात आले आहे .आज एक मालाने भरलेला ट्रक पुणे बाजू कडून नगरचा दिशेने जात असताना विद्याधाम प्रशाले समोर हे वाहन डांबरी रस्त्यावरुन खाली उतरुन खोदलेल्या रस्त्यावर आले कलंडलेल्या अवस्थेत हे वाहन उभे राहिले व ही गाडी पलटी होत्या वाचली सुदैवाने यावेळी रस्त्तावर तुरळक वाहने व रहदारी असल्याने मोठा अनर्थ टळला 
जर वर्दळीच्या वेळेस हा ट्रक पलटी झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती . 
फोटो ओळी 
शहरातील पुणे नगर रस्त्यावर कलंडलेल्या अवस्थेत उभा असलेल्या ट्रक 
खोदुन ठेवलेला रस्ता 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button