शिरूर तालुका

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या झालेल्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील अ ब क या वर्गासाठी शंभर टक्के मतदान ,मतदान शांततेत – निकाल चार तारखेला

शिरूर ama9  वृत्तसेवा 
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकसाठी शिरूर येथील मतदान केंदावर शांततेत मतदान पार पडले . सकाळ पासुन मतदान केंद्रावर मतदारांचा ओघ सुरु होता तर अ ब क वर्गात शिरूर तालुक्यातुन शंभर टक्के मतदान झाले आहे . 
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी येथील शिरूर नगर परिषद सेंटर शाळा येथे  शांततेत मतदान पार पडले .  यावेळी झोनल अधिकारी म्हणुन सहाय्यक निंबधक शंकर कुंभार यांनी तर केंद्र प्रमुख म्हणुन संजय जगदाळे म्हणुन काम पाहिले तर शिरुर पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राउत व सहाय्यक पोलीस निरीक्षक  किरण उंदरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
यावेळी झालेल्या मतदानासाठी शिरूर तालुका अ वर्ग (सोसायटी ) मतदार संघातील उमेदवार आमदार अशोक पवार प्रतिस्पर्धी उमेदवार आबासाहेब गव्हाणे, ड वर्ग मतदार संघातील उमेदवार दादा पाटील फराटे तसेच त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडुन दिगंबर दुर्गाडे हे उभे असुन , क वर्ग मतदारसंघातून प्रदीप कंद हे उभे आहेत . तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडुन सुरेश घुले हे उभे आहेत .
 विधान परिषद आमदार निरंजन डावखरे  यांनी सुध्दा सोसायटी मतदारसंघातुन मतदानाचा हक्क बजावला . 
 या  वेळी मतदान केंद्रावर माजी आमदार बाबुराव पाचर्णे , पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, जिल्हा दुध संघाच्या संचालिका केशरताई पवार,जिल्हा परिषद सदस्या सुजाता  पवार, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे,माजी सदस्य शेखर पाचुंदकर , राहुल पाचर्णे, शिरूर आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , 
घोडगंगा कारखान्याचे व्हा .चेअरमन रंगनाथ थोरात ,संचालक राजेंद्र गावडे,
संतोष रणदिवे ,  बाबासाहेब फराटे, माजी संचालक पांडुरंग थोरात
बाजार समिती सभापती अँड. वसंतराव कोरेकर उपसभापती प्रविण चोरडिया, तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, उपसभापती बाळासाहेब नागवडे,  बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, शशिकांत दसगुडे  , बालाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदाशिव पवार  , खरेदी विक्री संघाचे संचालक प्रदिप सोनवणे,  नगरसेवक नितीन पाचर्णे ,भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे  ,  घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,  लिगल सेलचे शहरअध्यक्ष अँड.रविंद्र खांडरे . रंजन झांबरे यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व दिग्गजांसह समर्थक कार्यकर्त्यांनी  मतदानासाठी  मतदान केंद्रावर हजेरी लावली . यावेळी मतदान केंद्राच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती .
शिरूर तालुका सोसायटी अ वर्ग व ब वर्ग मतदार संघातील एकून शंभर टक्के  मतदान झाले असून अ वर्ग साठी १३१ पैकी १३१ व प्रक्रिया पनन ब वर्ग साठी एकून ७ पैकी ७ मतदान झाले . तर  क वर्ग नागरी बँका पतसंस्थासाठी  ३२ पैकी ३२ व पाणी पुरवठा दुध संस्था सर्व साधारण ड वर्ग साठी  १०३ मतदान झाले .पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिरूर ‘अ’ वर्ग सोसायटी मतदारसंघातून आमदार अॅड. अशोक पवार यांच्याविरोधात आबासाहेब गव्हाणे हे प्रतिस्पर्धी  आहेत, तर सर्वसाधारण ‘ड’ वर्ग मतदारसंघातून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, ‘क’ वर्ग मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद या  दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन मंगळवार दि . ४ रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
फोटो ओळी मतदान केंद्रा बाहेर झालेली समर्थकांची गर्दी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button