शिरूर तालुका

शिरूर येथील विविध संघटने तर्फे शहरातील उंच असलेल्या सिध्दिचा माळ येथे साफ सफाई – नागरिकांकडुन कौतुक

शिरूर ama9  वृत्तसेवा 
शिरूर नगरपरिषद, वनविभाग, शिरूर, जनविकास फाउंडेशन, सी टी बोरा महाविद्यालय, शिरूर, वात्सल्यसिंधू सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर वनीकरण परिसर, शिरूर अर्थात सिद्धीचा माळ येथे सोमवार दि 03 जानेवारी 2022 रोजी सकाळी  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने , माझी वसुंधरा अभियान ,हरित शिरूर अभियान, स्वच्छ भारत अभियान
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शिरूर शहरातील मध्यवर्ती सर्वात उंच टेकडी 80 एकर 11000 झाडांनी व्यापलेला  परिसरात   शिरूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. सिद्धेश्वर वनीकरण शिरूर येथे स्वच्छता अभियानामध्ये शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर स्वच्छता व आरोग्य समिती  सभापती विठ्ठल पवार ,सिटी बोरा कॉलेज चे डॉ प्रा अंबादास खेत  व डॉ प्रा दत्तात्रेय बोबडे  ,वनविभाग अधिकारी भुतेकर , वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या उषा वाखारे, द हीलिंग फाउंडेशन सांबरे  , समता परिषदेचे किरण बनकर , नवनाथ शिंदे, जनविकास फाऊंडेशनचे तुषार वेताळ ,सिद्धेश्वर वनीकरण ग्रुप चे डॉ सुरेंद्र ढमढेरे ,डॉ अतुल कुमार बेंद्रे, लक्ष्मण डोके योगेश देशमुख, राज वारके, बबन थोरात, संतोष साळी, माधव कौठकर ,बाळासाहेब थिटे,विजय देशमुख, सिटी बोरा कॉलेज चे विद्यार्थी, विद्यार्थिनी नगरपरिषदेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या वेळी 2 गाड्या प्लास्टिक व काचेच्या सुमारे 400 बाटल्या गोळा करण्यात आल्या .
फोटो ओळी सिध्दिचा माळ येथे साफ सफाई करताना नागरिक 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button