स्वराज्य जनणी…ज्ञान ज्योती संपर्क मोहीम अभियानास शिरूर येथे सुरुवात – युवा स्पंदनच्या प्रियांका धोत्रे यांची माहिती
शिरूर ama9 वृत्तसेवा स्वराज्य जनणी…ज्ञान ज्योती संपर्क मोहीम अभियानास शिरूर येथे नुकतीच सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती युवा स्पंदन च्या प्रियंका धोत्रे यांनी दिली . क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त औचित्य साधून युवा स्पंदन,शिरूर च्या माध्यमातून *स्वराज्य जनणी ज्ञान ज्योती संपर्क मोहीम अभियान* या अभिनव उपक्रमाची क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरवात करण्यात आली,हे अभियान राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत चालणार असून आपल्याला भागातील विविध महिलांचा या निमित्त युवा स्पंदन च्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे. स्त्रियांच्या मुक्तीदात्या असणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची असुन त्यांचे शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे व त्यांनी रूजविलेले शैक्षणिक मुल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे याचाच एक भाग म्हूणन शिक्षण दानाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु , इतर शिक्षिका सुनंदा लंघे , कृष्णाबाई जाधव , निर्मला चाबुकस्वार , सोनाली मिरजकर , मनिषा रासकर , मधुबला धाडीवाल , अंजली माने , दिपाली कुर्हे , मोनाली परभाणे यांना प्रत्यक्ष भेटून गौरवण्यात आले.या उपक्रमाच्या पुढच्या टप्यात विविध क्ष्रेत्रातील महिलांना गौरवून राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यांनी स्त्रीविरोधी कुप्रथांना मोडून समाजात जागृती आणण्यासाठी व महिलांमध्ये शिक्षणाची ज्योती जगवण्यासाठी आजीवन संघर्ष केला. महिला सशक्तिकरणासाठी समर्पित त्यांचे जीवन राष्ट्रप्रेरणेचे स्त्रोत आहे असे युवा स्पंदन च्या प्रियांका धोत्रे यांनी सांगितले.यावेळी युवा स्पंदन चे वाघ , तनुजा रासकर , जयेश धोत्रे ,वृषाली रासकर व विविध प्रतिनिधी आणि शिरूर परिसरातील नागरिक उपस्थित होते. फोटो ओळी शिक्षक महिलांनचा सत्कार करताना युवा स्पंदन चे प्रियंका धोत्रे व इतर



