शिरूर तालुका

महाराष्ट्र शासनाने किराणा व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा – शिरूर शहर भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी

शिरूर ama9  वृत्तसेवा  महाराष्ट्र शासनाने किराणा व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा   घेतलेला  निर्णय हा तरुणांसाठी, लहान मुलांसाठी व महिलांसाठी चुकीचा असल्यामुळे निर्णय मागे घ्यावा अशी मागणी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने शिरूर तहसीलदार यांना निवेदन देउन करण्यात आली . शिरुर शहर भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतिने महाराष्ट्र सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निषेधार्थ शिरुर तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.  यावेळी भाजपा शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेश गादिया, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष बाळु महाराज जोशी ,सरचिटणीस विजय  नर्के, उपाध्यक्ष निलेश नवले,भाजपा शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष अशोक शेळके ,जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यांक राजु शेख,उमाकांत मिश्रा,जी.के.मुळे सर,राजेंद्र महाजन,उमेश शेळके, केरुभाऊ गाडेकर, राजुभाऊ चोंधे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात असे म्हटले आहे कि
महाराष्ट्र राज्य सरकारने वाईन किराणा दुकानात विकण्याचा दुर्देवी निर्णय घेतला आहे. शाळकरी मुलांना व तरुणाईला व्यसनाधीनतेची चटक लावू पाहणारा हा निर्णय आहे. राज्य सरकार सांगतय की या निर्णयाने शेतकऱ्यांचा फायदा होईल, परंतु  हा निर्णय घेताना केवळ आणि केवळ वसुली करणाऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. सर्वसामान्य लोकांचे कुटुंब, संसार व्यसनामुळे उध्वस्त होत असतात त्याला आजून हातभार लागेल. महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील तरुण हा व्यसनाच्या आहारी जाईल या  निर्णयाची ग्रामीण भागात अधिक झळ बसणार आहे त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .
फोटो ओळी नायब तहसीलदार यांना निवेदन देताना भाजपा आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button