शिरूर तालुका

आगामी नगरपालिका ,महानगपालिका ,जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूका जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष लढविणार – पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष नाथा शेवाळे यांची माहिती

शिरुर ama9  वृत्तसेवा आगामी नगरपालिका ,महानगपालिका ,जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूका जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष लढविणार असुन यासंदर्भात समविचारी पक्षांशी चर्चा चालू असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली . नुकतीच पक्षाच्या कार्यकर्त्याची बैठक शिरूर येथे संपन्न झाली . बैठकीला जनता दल जिल्हाध्यक्ष संजय बारवकर  ,तालुकाध्यक्ष विष्णुपंत दसगुडे ,शहराध्यक्ष हाफिज खान , गणपत लोखंडे ,श्रीमती ताराबाई बैनाडे ,प्रदिप करडे , दिगंबर शिरसाट , आसिफ अब्दुल रहेमान सय्यद , स्वप्निल वेताळ ,प्रशांत काळे ,  अमोल बो – हाडे , रवी मांढरे ,माधव मुंडे आदी उपस्थित होते . शेवाळे म्हणाले की निवडणूकी संदर्भात समविचारी पक्षाना चर्चे द्वार खुले आहेत . येणा- या काळातील सर्व निवडणूका जनता दल धर्मनिरपेक्ष मित्र पक्षांबरोबर लढविणार आहे . जिल्हाध्यक्ष संजय बारवकर  म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाव्यात शिरुर नगरपरिषदेची मागील पंचवार्षिक निवडणूकीला पक्षाचे तीन उमेदवार लोकशाही क्रांती आघाडी या पॅनेल मधुन निवडणूक लढले होते यंदाच्या शिरुर नगरपरिषदेच्या निवडणूकीत जास्तीजास्त जागा पक्षाने लढवाव्यात असे बारवकर म्हणाले . यावेळी नगरपरिषद निवड्णूकीसाठी इच्छुक असणारे  उमेदवार उपस्थित होते . फोटो ओळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत मार्गदर्शन करताना नाथा शेवाळे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button