शिरूर तालुका

राज्य सरकारने वाईन संदर्भात घेतलेल्या निर्णयावर भाजप नेते विरोध करत आहे.ही त्यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिरूर येथे केली.

शिरूर ama9  वृत्तसेवा  

राज्य सरकारने वाईन संदर्भात घेतलेल्या निर्णयावर भाजप नेते विरोध करत आहे.ही त्यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली.
राज्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शिरूर येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिरूर नगरपरिषदेच्या नविन प्रशासकीय इमारतीची पाहणी खडसे यांनी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते . या वेळी आमदार ॲड अशोक पवार ,नगराध्यक्षा वैशाली वाखारे , बांधकाम समिती सभापती अभिजीत पाचर्णे ,स्वच्छता व आरोग्य समिती सभापती विठ्ठलल पवार , मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर सह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते . 
यावेळी बोलताना खडसे  म्हणाले की,राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा सरकारचा निर्णय आहे.या निर्णयावर भाजप नेते  विरोध करत आहे.भाजप नेते इकडे विरोध करत असताना मध्य प्रदेश,गोवा आदी राज्यांमध्ये गल्ली बोळानी दारू विकली जाते.तिकडे मात्र कोणी विरोध करत आहे.तिकडे गरिबांचा मुद्दा केला जातो.इकडे मात्र विरोध केला जातो ही दुटप्पी भूमिका भाजप नेत्यांची आहे.
बंडातात्या कराडकर यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की,बंडातात्या यांनी माफी मागितली आहे यावर पडदा पडला आहे मात्र त्यांनी जे वक्तव्य केले ते अपुऱ्या माहितीच्या आधारे केले आहे.व्यक्तिगत जीवनात कोण काय करत यावर बोलण्याचा अधिकार नाही.त्यांनी विनाकारण महिला नेत्यांची बदनामी केली आहे.जे केलं ते योग्य केलं नाही असं ते बोलताना म्हणाले.
शिरूर नगरपरिषद इमारत पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत शिरूरनगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल  यांचे कौतुक केले व मि सुध्दा मंत्री व विरोधी पक्ष नेता होतो पण मंत्रालयात सुध्दा असे कार्यालय पाहिले नसल्याचे खडसे या वेळी म्हणाले 
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार,नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या कामाचे कौतुक करत  आमदार अशोक पवार हे  विविध प्रश्नान संदर्भात सातत्याने प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला आमदार कसा असावा तर तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता जो विकासाला प्राधान्य देतो व आपल्या मतदारसंघातील  बारीक गोष्टींनची सोडवणूक झाली पाहिजे असे आमदार म्हणजे अशोक पवार असल्याचे खडसे यांनी गौरोवउदगार   या वेळी काढले  .  विकासाला प्राधान्य देणारा आमदार असे म्हणत त्यांचे कौतुक केले.
फोटो ओळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे शिरूर नगरपरिषदेच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहा मध्ये स्वागत करताना आमदार ॲड अशोक पवार 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button