शिरूर तालुका
आमदारांना निनावी पत्राद्वारे धमकी देणाऱ्यानचा शोध घ्या अन्यथा दि २४ पासुन बेमुदत उपोषण करणार – मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांची माहिती
शिरूर ama9 वृत्तसेवा
शिरूरचे आमदार ॲड अशोक पवार व अन्य लोकांना निनावी पत्राद्वारे तुमचा महेंद्र मल्लाव होइल अशी धमकी देणाऱ्यांना शोधुन त्यांची नावे जाहीर करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी २४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण बसणार असल्याचे मनसे शहरप्रमुख अविनाश घोगरे यांनी सांगितले .
या संदर्भातील निवेदन शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दिले आहे .
या निवेदनात असे म्हटले आहे कि १७ ऑक्टोबर २०२१ रोजी काही शिरूर करांना निनावी पत्रे आलेली होती. यात काही राजकीय, सामाजिक व व्यावसायिक लोकांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. विशेष म्हणजे तालुक्याच्या आमदारांना या धमकीवजा पत्रामुळे सर्वचजण धास्तावून गेलेले होते. त्या धमकीवजा पत्रांचा नागरिकांनी सोशल मीडिया वर चांगलाच खरपूस समाचार घेतलेला होता. या धमकी पत्राचा निषेध संपूर्ण तालुक्यात झाला .
तसेच. त्यावर विधान भावनातही चर्चा होऊन, एस आय टी मार्फत चौकशी करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले होते. तसेच, या निनावी धमकी प्रकरणापासून आमदार अशोक पवार यांच्यासाठी, पोलीस अंगरक्षकही देण्यात आला होता.
या पत्र प्रकरणाला आता जवळ जवळ चार महिने होत आले, तरीही ही पत्रे पाठविणाऱ्याचा शोध पोलीस लावू न शकल्याने, मनसेचे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी, २५ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, यांना मेल द्वारे या प्रकरणाची चौकशी त्वरित करण्याचे पत्र दिलेले होते. परंतु त्याला १५ दिवस उलटूनही पोलीस विभागामार्फत अविनाश घोगरे यांना उत्तर न मिळाल्याने, दि २३ फेब्रुवारी पर्यंत जर उत्तर मिळाले नाही तर २४ फेब्रुवारी २०२२ पासून शिरूर पोलीस स्टेशन समोर, आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
फोटो ओळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन देताना मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे



