शिरूर तालुका

आमदारांना धमकी देण्या संदर्भात पत्राबाबत शिरूर पोलीस स्टेशनने पत्र दिल्या नंतर मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांचे उपोषण स्थगित

शिरूर ama9   वृत्तसेवा 
शिरूरचे आमदार ॲड अशोक पवार  व अन्य लोकांना निनावी पत्राद्वारे तुमचा महेंद्र मल्लाव होइल अशी धमकी देणाऱ्यांना शोधुन त्यांची नावे जाहीर करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी  २४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण बसणार असल्याचे मनसे शहरप्रमुख अविनाश घोगरे यांनी सांगितले होते मात्र या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घोगरे यांना पत्र दिले असुन या संदर्भात लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे पत्रात म्हटले आहे  . त्या मुळे हे उपोषण स्थगित करत असल्याचे अविनाश घोगरे यांनी सांगितले . 
या संदर्भातील निवेदन शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी हे पत्र घोगरे यांना दिले . यावेळी मनसे तालुकाअध्यक्ष तेजस यादव ,उपजिल्हाअध्यक्ष किरण गव्हाणे , संजय काळे , बंडू दुधाणे आदी उपस्थित होते . या पत्रात असे म्हटले आहे कि ०९/०२/२०२२ रोजी  पोलीस अधीक्षक  पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशनला निनावी पत्रादवारे शिरूर हवेलीचे आमदार  अशोक  पवार यांना जिवे मारण्याची धमकी देणा-या लोकांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र दिले होते व सदर लोकांवर कायदेशीर कारवाई न केल्यास दिनांक २४  रोजी शिरूर तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याबाबतचा इशारा दिला होता. सदर निनावी पत्राच्या अनुशंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुरनं १४५२/२०२१ भादवि ५००, ५०१,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्हयाचा तपास  न्यायालय  यांचे आदेशाप्रमाणे चालु असुन आज रोजी सदर गुन्हा तपासावर प्रलंबित आहे. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण झालेच्या नंतर गुन्हयाचा अंतिम अहवाल  न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल. तरी आपण आपले दि २४ फेब्रुवारी रोजी शिरूर तहसील कार्यालयासमोरील आमरण   उपोषण स्थगित करावे असे पत्रात म्हटले आहे . 
फोटो ओळी  घोगरे यांना पत्र देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व इतर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button