शिरूर तालुका
शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चाबांधणी सुरु प्रभाग रचनेच्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिरुर मध्ये राजकीय घडामोडींना वेग
शिरूर ama9 वृत्तसेवा
डिसेंबर २०१६ रोजी शिरूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडली होती. शिरूर नगरपरिषदेच्या सध्याच्या सदस्यांची मुदत १४ फेब्रुवारी रोजी संपली . त्यानंतर शिरूर नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणुक झाली . मात्र काही महिन्यातच शिरूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे . त्या मुळे इच्छुकानी काही महिन्या पासुनच तयारी सुरु केली आहे .
शिरूर नगरपरिषदेवर २००७ पासुन शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे . शिरूर विकास आघाडीचे नेतृत्व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल करत आहे . या विकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस,शिवसेना,कॉंग्रेस (आय ) आदी पक्षांचा समावेश आहे . तर विरोधात भाजप,मनसे , लोकशाही क्रांती आघाडी ,बसपा आदीनी मागील निवडणुकीत उतरले होते . सध्याच्या नगरपरिषदेमध्ये शिरूर विकास आघाडी चे १७ , भाजपचे २ ,लोकशाहीक्रांती आघाडीचे १ ,अपक्ष १ व स्वीकृत नगरसेवक २ असे पक्षीय बलाबल होते . नगराध्यक्ष थेट नागरिकांनमधुन निवडून देणे होते त्यात शिरूर विकास आघाडीच्या वैशाली वाखारे ह्या निवडून आल्या होत्या. असे २४ संख्या होती . आगामी निवडणुकीत १२ प्रभाग नियोजित केले असुन त्या मुळे २४ व २ स्वीकृत असे २६ सदस्य संख्या असणार आहे . सर्व इच्छुकानी मोर्चे बांधणी सुरु केली आहे . मात्र निवडणूकीला अजुन बराच काळ असल्याने पुलाखालुन बरेच पाणी वाहून जाणार आहे . शिरूर शहर विकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या भरपूर असुन विद्यमान नगरसेवकांन पैकी किती जणाना उमेदवारी मिळते हे सुध्दा महत्त्वाचे आहे . शिरूर शहर विकास आघाडीचे सर्व निर्णय हे आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल हे घेणार आहे . शिरूर शहर विकास आघाडी मध्ये मात्र सर्वात जास्त इच्छुकांची संख्या राष्ट्रवादीकडुन असुन खासदार व आमदार राष्ट्रवादीचे असल्याने त्यांचा वरचस्मा या उमेदवारी निवडीमध्ये राहील असे राजकीय जाणकरांचे मत आहे . तसेच मागील निवडणुकीत शिवसेना विकास आघाडीत होती . त्या वेळी शिरूर लोकसभेचे खासदार हे शिवसेनेचे होते . त्यामुळे शिवसेनेच्या दोन उमेदवारांची वर्णी मागील वेळेस लागली होती . त्या वेळेस झालेल्या निवडणुकीत शिवसेना शहरप्रमुख यांचा पराभव होऊन सुध्दा स्वीकृत सदस्यपदी त्यांची वर्णी लागली होती . मात्र या वेळची परिस्थिती फार वेगळी असुन खासदार व इतर कुणीही पाठीशी नसल्याने या वेळेस शिवसेनेची अडचण होणार आहे . कॉंग्रेस (आय) ला शिरूर विकास आघाडीत स्थान मिळेल त्यांच्या एका उमेदवाराला संधी मिळु शकते . तर विरोध पक्ष असलेला भाजप पक्षाचे दोन उमेदवार मागील वेळेस जनतेने निवडुन दिले होते . मात्र या वेळेस नागरिक काय करतात या कडे पाहणे गरजेचेआहे . या निवडणुकीत भाजप स्वतंत्र पॅनेल टाकणार कि कोणाशी युती करणार याकडे पाहणे गरजेचे आहे . मनसे ने अनेक आंदोलन केली असली तरी त्या आंदोलनानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले . मनसे मध्ये ४ ते ५ गट असुन त्यातील एक गट शिरूर विकास आघाडीकडे वळला असुन दुसरा गट लोकशाही क्रांती आघाडीकडे तर तिसरा गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे . लोकशाही क्रांती आघाडी कडुन एक नगरसेवक निवडुन आला त्यांनी विविध प्रश्नांनानवर सभागृहात व बाहेर आवाज उठविला त्यांना लोकशाही क्रांती कडुन पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे . तसेच वंचित बहुजन आघाडी, जनता दल (सेक्युलर) ,बसपा ,आर पी आय ,बहुजन मुक्ती पार्टी,आम आदमी पार्टी या सुध्दा निवडणुकीत उतरणार आहेत . मात्र कोणाची आघाडी कोणाशी होइल हे निवडणूक जवळ आल्यावरच कळेल . या कडे नागरिकांनी गांभीर्याने घेतल्या पाहिजे. शिरूर शहरात निवडणूकचे जोरदार वारे वाहत असुन मागील पाच वर्षात केलेल्या चांगल्या कामामुळे बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे , स्वच्छता समितीचे सभापती विठ्ठल पवार ,शिरूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व पाणी पुरवठा समिती सभापती मुज्जफर कुरेशी व नगरसेविका संगिता मल्लाव यांची उमेदवारी शिरूर शहर विकास आघाडीकडुन सध्यातरी निश्चित मानली जात आहे .



