शिरूर तालुका

हर हर महादेव अशा जयघोषात भक्तीमय वातावरणात प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या पालखीचे शिरूर शहरातुन प्रस्थान

शिरुर ama9  वृत्तसेवा 
मागील दोन वर्षापासुन कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले होते . सन २०२१ मध्ये कोरोना सर्व यात्रा रद्द करण्यात आले होते राज्यातील मंदिरे बंद होती. मात्र या वर्षें कोरोना कमी झाल्यामुळे यात्राना परवानगी मिळाली. जुने शिरूर येथे रामलिंग महारांजाच्या यात्रेला सुरुवात झाली .  ढोल ताशा अन सुमधुर बॅंड, टाळघोषांचा गजर अन हर हर महादेव चा नामघोष करत  शिरूर शहरातुन जुने शिरूर (रामलिंग) चे जागृत देवस्थान श्री रामलिंग महाराज पालखीचे मोठ्या भक्तीभावाने प्रस्थान झाले.शिरूर तालुक्याचे जागरूक देवस्थान रामलिंग महाराज यात्रा महाशिवरात्री च्या दिवशी जुने शिरूर येथील मंदिरात  यात्रा भरवली जाते. त्या अगोदरच्या दिवशी या यात्रेची पालखीचा मान शिरूर शहराला असतो तर यात्रेचा मान शिरूर परिसरातील पंचक्रोशिला असतो. शिरूर शहरांतील शिवसेवा मंदिरात उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते महाआरती करून पालखी सोहळ्यास दुपारी सुरुवात झाली. यावेळी शिरुर हवेलीचे आमदार  ॲड  अशोक पवार, हे उपस्थित होते . प्रथेप्रमाणे पालखी सोहळ्याचे स्वागत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी पालखीस पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी देवस्थान अध्यक्ष प्रकाश धारिवाल,विश्वस्त यांना नगरपरिषद यांचे वतीने मानाचा फेटा बांधण्यात आला व मुख्य पालखी सोहळ्यास शहरातुन सुरवात झाली.या पालखी सोहळ्यासाठी रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल,  युवा उद्योजक आदित्य धारीवाल ,  माजी आमदार बाबुराव पाचर्णे , ट्रस्टी तुळशीराम परदेशी, पोपटराव दसगुडे,गोदाजी घावटे,रावसाहेब घावटे,वाल्मिकराव कुरंदळे, बलदेवसिंग परदेशी,नामदेव घावटे हे ट्रस्टी तसेच सल्लागार जगन्नाथ पाचर्णे,कारभारी झंजाड,बबनराव कर्डिले हे तसेच शिवसेवा मंडळ ट्रस्टचे ॲड .सुभाष पवार,मनसुख गुगळे,डॉ.योगेश उपलेंचवार,ज्ञानेश्वर घावटे,सुरेश खांडरे,श्रीनिवास परदेशी,  शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर , माजी नगराध्यक्ष रविंद्र  ढोबळे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती  विठ्ठल पवार,बांधकाम समिती सभापती अभिजित पाचर्णे,पाणी पुरवठा समिती सभापती मुजफ्फर कुरेशी,  अमोल चव्हाण  व सर्व नगरसेवक, नगरसेविका,रामलिंगचे माजी सरपंच अरुण घावटे,माजी उपसरपंच संजय शिंदे,रामलिंगचे सरपंच नामदेव जाधव, पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर डेरे,  राजेंद्र लोळगे पंचक्रोशि चे तरुण कार्यकर्ते यांसह आबाल वृद्ध यांनी पालखी व रामलिंगचे दर्शन घेतले. या वेळी शिरुर शहरातील भाविक मोठया प्रमाणात उपस्थित होते.आजच्या या पालखी सोहळ्यात संपूर्ण शिरूर शहर भगव्या पताका, भगवे झेंडे, प्रत्येक ठिकाणी स्वागतासाठी कमानी उभारल्या होत्या.शहरातील पुणे-नगर रस्त्यावर विद्युत रोशनाई करण्यात आली होती. पालखी मिरवणुक मधे प्रत्येक नागरिकांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. यामुळे भगवेमय वातावरण तयार झाले होते.चौका-चौकात प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिरुर,पारनेर,श्रीगोंदा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शिरूरचे निनाद ढोल पथक,डोने ता.मावळ येथील झांज पथक,चाळीसगाव येथील सदगूरू  व समर्थ ब्रास बॅड,  हबीब ब्रास बॅड तर आळंदी येथील वारकरी भजनी मंडळ तर पालखी समोर असलेले भालदार चोपदार,तुलसी घेतेलेले महिला व सहभागी अश्व हे आजच्या पालखी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले तर शहरातील कापड बाजार,अखिल रामआळी,दधिची चौक, मारुती आळी, आझाद सोशल क्लब, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभारआळी, अजिंक्य तारा मित्र मंडळ, मुम्बई बाजार, डबेनाल मित्र मंडळ यांनी यात्रे निमित्त वेगवेगळे देखावे केले होते .   तर शहरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले. उद्या पहाटे शिरूर शहरातून रामलिंग येथे प्रस्थान होईल रामलिंग मंदिरात पालखी पोहचल्या नंतर महाभिषेक होऊन महाशिवरात्र निमित्त रामलिंग यात्रेस सुरवात होती.

फोटो ओळी : प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या पालखीचे शिरुर शहरातुन मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाले.यावेळी श्रींच्या पालखीला खांदा देताना पालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, आमदार ॲड अशोक पवार ,आदित्य धारिवाल इतर.(छाया.अभिजित आंबेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button