शिरूर तालुका
शिरुर शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेले एक सक्षम व कणखर , प्रभावी ,सर्वांना सामावुन घेणारे योग्य नेतृत्व म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाउ धारीवाल
शिरुरच्या विकासाचा ध्यास घेतलेले कुशल व योग्य नेतृत्व – प्रकाश धारिवाल
पुणे नगर रस्त्यावरील शिरुर हे गाव या गावाला घोडनदी असे ही म्हणतात या शहरातील कर्तुत्ववान व आपल्या कार्याने संपूर्ण विश्वभर ख्याती पसरलेले घराणे म्हणजे धारिवाल घराणे . दातृत्व ,कर्तृत्व व नेतृत्व या तीनही आघाडीवर या धारिवाल घराण्याचा मोठा नावलौकिक आहे .
धारिवाल घराण्यातील माणिकचंदजी धारिवाल ,रसिकलालजी व प्रकाशलालजी धारिवाल यानी शिरुर नगरपरिषदेचे नेतृत्व करित शिरुर शहराच्या चेहरा मोहरा बदलत या शहराच्या जडणघडणीला मोठ्या हातभार लावला आहे .सर्व जाती धर्माना व विविध राजकिय पक्षाना बरोबर घेवून शिरुर शहराचा विकास या एकाच ध्येयाने कार्यरत असणारे रसिकलाल व प्रकाशलाल हे सर्व शिरुरकरांचे आयडॉल आहेत .शिरुर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या जन्म ७ मार्च रोजी झाला . वडिल रसिकलालजी व मातोश्री कमलाबाई व आजी मदनबाई धारिवाल यांनी दिलेल्या आदर्श व संस्कारानुसार प्रकाशजी आपली जीवनाची वाटचाल करित आहे .
राजकारण ,समाजकारणाचा मोठा वारसा प्रकाश धारिवाल यांना वडिल रसिकलाल धारिवाल यांच्या कडून मिळाला . इतराना अडीअडचणीत मदत करणे ,गोरगरिबांचे अशृ पूसणे त्याच्या सुख दु :खात सहभाग होणे यासाठी ते नेहमीच पुढे असतात .
धार्मिक कार्यात ही त्याच्या सहभाग असतो. गणपती विसर्जन मिरवणूक असो की महावीर जयंती अथवा मुस्लिम बांधवाचा रमजान ईदचा सोहळा किंवा ख्रिस्त धर्मियाच्या नाताळ यासर्वच ठिकाणी प्रकाशभाउंचा सहभाग असतो .
सन २००७ला प्रकाशभाउ धारिवाल हे शिरुरचे नगराध्यक्ष झाले नगराध्यक्षपदाचा काळात अनेक विकासकामे मार्गी लावत त्यानी आपल्या कामाची चूणुक दाखवून दिली. सर्वाना समवेत घेत काम कसे करावे हे प्रकाशभाउ यांच्या कडून शिकावे . नम्रता ,इतरांशी सौजन्याने बोलणे व सतत सकारात्मक दृष्टीकोन ,साधेपणा हे प्रकाश भाउ मधील गुण महत्वाचे आहेत . नगरपरिषदेत सभागृहनेता व उपनगराध्यक्ष या पदांवर ही भाउनी काम केले आहे .
कोरोना काळात ज्यावेळेस सर्वत्र टाळेबंदी सुरु झाले रोजगार व्यवसाय ठप्प झाले अश्या वेळेस अनेकान पुढे जीवन जगायचे कसे दररोजची पोटाची भूक कशी भागवायची असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेच घरातील मोठा भाउ या नात्याने प्रकाशभाउनी शहरातील अनेक जणांसाठी दोन वेळच्या जेवण्याची सोय केली शेकडो कुटुंबाना घरपोच जेवण्याचे डब्बे पोहचविले . एवढेच नाही तर या काळात जे अनेक परप्रांतीय लोक पायी आपल्या गावाकडे पुणे नगर रस्त्याने दररोज जात होती अश्या लोकानाही जेवण्याचे डब्बे प्रकाशभाउ नी पुरविले .एवढे मोठे मानवसेवेचे काम त्यानी कोरोनाचा काळात केले. त्याच बरोबर कोरोनाचा काळात त्यानी शिरुर परिसरातील अनेक गरजू रुग्णाना ऑक्सिजन सिलेंडर ही मोफत उपलब्ध करुन दिले .
काम करित असताना सर्वाना बरोबर घेवून एकत्रित पणे काम करण्याची त्याची खासियत आहे . जागतिक पातळीवर उद्योगपती असताना ही अगदी सहजपणे ते सर्वसामान्या मध्ये मिसळतात व त्याच्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे बोलतात . अगदी साधेपणाने ते राहत असतात त्याच्या या साधा व व सर्वसामान्यांत मिसळून काम करण्याचा स्वभावामुळे ते सर्वाचे भाउ बनले आहेत त्यामुळे त्याना सर्वजण आदराने व प्रेमाने प्रकाश भाउ या नावाने संबोधतात .
जुन्या व नव्या पिढीशी त्याच्या उत्तम समन्वय आहे यामुळे प्रकाशभाउच्या समवेत जुने जाणते ज्येष्ट असतात त्याचप्रमाणे नवीन युवा पिढीतील तरुण ही असतात . कुशल नेतृत्वाला जुन्या व नव्या पिढीशी योग्य संवाद व समन्वय राखता येणे आवश्यक मानले जाते. प्रकाशभाउच्या नेतृत्वाने नव्या व जुन्या पिढीशी योग्य असा समन्वय ठेवला आहे .
भारतातील विविध धार्मिक कामासाठी देणग्यासाठी प्रकाशभाउ हे सदैव तत्पर असतात . प्रभू रामचंद्र यांच्यावर असलेली भक्ती यामुळे त्यानी आयोध्या येथे साकारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामाचा मंदिरासाठी ही मोठी देणगी दिली आहे .
त्याच बरोबर शिरुर शहरात अनेक वर्षापासून जिजामाता उद्यानात जिजाउसृष्टी व्हावी अशी मागणी करण्यात येत होती या जिजाउ सृष्टीचा उभारणीसाठी व पाबळ फाटा चौकात होवू घातलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या पुतळा व हुतात्मा स्मारक याकरिता प्रकाश भाउ यानी पुढाकार घेतला असून स्वखर्चातून ते ही कामे मार्गी लावणार आहेत .
शिरुर शहराच्या वैभवात भर घालणारी शिरुर नगरपरिषदेची भव्य अशी नूतन वास्तू प्रकाश भाउचा नेतृत्वाखाली दिमाखात उभी राहिली आहे शहराची होणारा विस्तार लक्षात घेवून अत्यंत दूरदृष्टीने ही इमारत उभी राहिली आहे. नगरपरिषदेची जुनी इमारत तत्काळीन नगराध्यक्ष रसिकलाल धारिवाल यांच्या कार्यकाळात उभी राहिली व आताची नवीन इमारत रसिकलालजीचे पुत्र प्रकाशभाउ यांच्या कार्यकाळात उभी राहील हाही एक महत्वाचा योगायोग आहे .
शहरातील हुडकोवासियांची घरे नावावर करण्याचा ही अनेक वर्षाच्या प्रलंबित प्रश्न प्रकाशभाउनी सर्वाना बरोबर घेवून मार्गी लावला आहे .धार्मिक कार्याबरोबर सामाजिक ,आरोग्यविषयक व शैक्षणिक कार्याला त्याचे मोठे आर्थिक पाठबळ असते .
स्वर्गिय रसिकलालजी धारिवाल यांच्या निधनानंतर त्याच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा दातृत्वाचा वारसा ते समर्थपणे पार पाडत आहे उद्योग व्यवसायात यशाची विविध शिखरे ते गाठत आहे . आपले गाव व सामान्यामाणसा विषयी असणारी आस्था ही थक्क करायला लावणारी आहे उद्योग व्यवसायात व्यस्त असतानाही आपल्या गावासाठी आपल्या माणंसासाठी ते आवर्जून वेळ काढतात आपल्या श्रीमंतीचा कोठे ही बडेजाव करित नाही अनेकदा सामान्य कार्यकर्त्याच्या मोटारसायकल वरुन ही शिरुर शहरात फिरताना अनेकानी पाहिले आहे . महाशिवरात्रीला होत असणा- या प्रभू रामालिंग महाराज पालखी सोहळ्यात ते पालखी समवेत पायी रामलिंग मंदिरात जातात व दर्शनबारीला रांगे मध्ये उभे राहून रामलिंगाचे दर्शन घेतात.शहरातील शिरुर शिक्षण प्रसारक मंड्ळाच्या बोरा महाविद्यालयाचा नियामक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत तर शिवसेवा मंडळ व रामलिंग देवस्थान ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत विविध संस्था संघटनावर ते कार्यरत आहे .
अत्यंत निर्लेप वृत्तीने प्रकाशभाउ समाजासाठी सातत्याने कार्यरत आहे.
कोणते ही काम करायचे ते मनापासू करायचे आपण या समाजाचे गावाचे काहीतरी देणे लागतो या कर्तव्याचा भावनेतून प्रकाशभाउ हे शिरुर शहरासाठी कार्यरत आहे .त्याच्या या कार्यात पत्नी दिनाभाभी पुत्र आदित्य कन्या साक्षी यांचे ही मोठे योगदान आहे .आम्हा शिरुरकराना जपणारे मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे आम्हा सर्वाच्या अभिमान असणारे
प्रकाशभाउ याची यशाची कर्तृत्वाची पताका गगनी उंच जावो .याच वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .







