शिरूर तालुका
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती व संचालक मंडळाने संस्था प्रगती पथावर नेऊन ठेवली – शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांचे प्रतिपादन
शिरूर ama9 वृत्तसेवा संस्थेचे प्रगती होण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी कामे केली पाहिजे त्यादृष्टीने शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने संस्था प्रगती पथावर नेऊन ठेवली असल्याचे शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले
शिरूर बाजार समिती आवारात रावसाहेब दादा पवार शिरूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघांचे व्यापारी संकुलाचा उद्घाटन समारंभ आमदार ॲड . अशोक पवार व उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या शुभहस्ते पार पडला . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती माजी सभापती सुजाता पवार , बाजार समिती सभापती ॲड . वसंतराव कोरेकर पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रविंद्र काळे , पंडीत दरेकर सहाय्यक निबंधक शंकर कुंभार
संस्थेचे सभापती राजेंद्र नरवडे ,उपसभापती बाळासाहेब नागवडे, शरद कालेवार , गुलाब सातपुते , संभाजी भुजबळ (संचालक)दत्तात्रय कदम , निळूभाऊ टेमगिरे ,नामदेव गिरमकर,
प्रदिप सोनवणे , शेखर कुरंदळे ,उत्तम सोनवणे सर्जेराव दसगुडे,सुजाता नरवडे,मनिषा प्रतिभा नागवड शेलार ,शहाजी ढमढेरे व्यवस्थापक रावसाहेब संकपाळ अनिल वर्पे या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी बोलताना उद्योगपती प्रकाश धारीवाल म्हणाले की,
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व .माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांचे व्यक्तिमत्व आगळे वेगळे असुन विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करणारे त्यागी नेतृत्व असल्याचे विचार उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी व्यक्त केले .
यावेळी संस्थेचे वतीने स्वागत व प्रास्ताविक सभापती राजेंद्र नरवडे यांनी तर उपस्थिताचे आभार उपसभापती बाळासाहेब नागवडे यांनी मानले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले .



