शिरूर तालुका
राजकारणात असलो तरी क्रिडा क्षेत्रात कधी राजकारण आणले नाही असे प्रतिपादन करित राजकारणात कोणता डाव टाकायचा हे कुस्तीतून शिकल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री शरद पवार यांनी शिरूर येथे व्यक्त केले .
शिरुर ama9 वृत्तसेवा
राजकारणात असलो तरी क्रिडा क्षेत्रात कधी राजकारण आणले नाही असे प्रतिपादन करित राजकारणात कोणता डाव टाकायचा हे कुस्तीतून शिकल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री शरद पवार यांनी केले .
पवार म्हणाले की कुस्ती हा खेळ या देशांतील सामान्य लोकांनी जोपासला आहे. राजकारणात असलो तरी क्रिडाक्षेत्रात कधीच राजकारण आणत नाही . कुस्ती मध्ये नवीन मुले तयार होत आहे . राज्याचा देशाचा नावलौकिक ही मुले वाढवित आहे कुस्ती हा धनिकांचा खेळ नाही खेड्यापाड्यातील सामान्य माणसाच्या घरातील मुले कुस्तीचा खेळात आहे मागील २५ वर्षापासून कुस्ती संघटनेची जबाबदारी पार पडत आहे .
प्रसिध्द उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन शिरुर येथील रयत शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते . त्या वेळी शरद पवार बोलत होते .
हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते माजी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीबरोबर राष्ट्रीय पातळी वरील मल्लांच्या सहभागाने व त्याच्यातील रोमहर्षक लढतीने शिरुर येथील राष्ट्रीय कुस्त्याचे मैदान गाजले .
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस चे अध्यक्ष माजी केंद्रिय मंत्री शरद पवार ,विठ्ठल मणियार , आमदार ॲड. अशोक पवार ,उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल ,दिनाभाभी धारिवाल , आदित्य धारिवाल , महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार , आयोजक माजी नगरसेवक अशोक पवार,आशिष शिंदे आदी उपस्थित होते .
सर्वाधिक चुरशीची कुस्ती महाराष्ट्र केसरी रफिक बाला शेख व हरियानाचा सोमभीर यांच्यात झाली दोन्ही मल्ल तुल्यबळ होते . या कुस्तीच्या निकाल गुणाधिक्यावर झाला. त्यात महाराष्ट्र केसरी रफिक बाला शेख विजयी झाले .
राजस्थानचा महिला मल्ल पोलीस इन्सपेक्टर नयना कणवाल व महाराष्ट्राची मल्ल रेश्मा माने यांच्यात ही चुरशीची लढत झाली या लढतीत नयना कणवाल विजयी झाल्या .
करीम मुलाणी व अनिल ब्राम्हाणे यांच्यातील लढतीत ब्राम्हाणे विजयी झाले . दिल्लीच्या मल्ल रवि गांधरिया व महाराष्ट्रातील मल्ल किरण भगत यांच्यातील लढतीत किरण भगत याने मल्ल रविला चितपट केले .
पहिल्या क्रमांकासाठीची कुस्ती महाराष्ट्राचा सिंकदर शेख व पंजाबचे विकास काला यांच्यात झाली .माजी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात लावली. या कुस्तीत सिंकदर शेख ने विकास कालाला चितपट केले .पंजाब ,हरियाना राजस्थान सह देशभरातून मल्ल कुस्ती मैदानासाठी आले होते . या स्पर्धेसाठी १०० मल्लांनी सहभाग घेतला .
या कुस्त्याचे समालोचन महाराष्ट्रातील सुत्रसंचालक कोल्हापूरचे शंकर पुजारी यांच्या निवेदनाने व हलकीवादक राजू आवाळे यांच्या हलकी वादाने मैदानात वेगळीच रंगत भरली .
उद्योगपती प्रकाश धारिवाल यावेळी म्हणाले की शरद पवार यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे .कुस्तीवर त्याचे खूप प्रेम असुन आजच्या कुस्त्याच्या मैदानास अमूल्य वेळ त्यानी दिला .
यावेळी प्रकाश धारिवाल याच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला . या वेळी ५८ किलोचा केक शरद पवार यांच्या उपस्थित कापण्यात आला .
चौकट
यावेळी उद्योगपती प्रकाश धारिवाल म्हणाले की शरद पवार याही वयात कार्यरत आहे याचा बोलण्याचा धागा पकडत पवार म्हणाले की धारिवाल मी तुमच्यावर नाराज आहे तुम्ही मी या वयात कार्यरत आहे असे का म्हणता मी म्हतारो झालेला नाही असे सांगितले
फोटो ओळी शिरूर येथे प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना खासदार शरद पवार व प्रकाश धारीवाल




