गुन्हेगारीशिरूर तालुका
चोरी गेलेले साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत शिरूर पोलिसांची दमदार कामगिरी

शिरूर प्रतिनिधी
चोरी गेलेले साडे सोळा तोळे सोन्याचे दागीने व दिड लाख रूपये रोख रक्कम असा एकुण १२ लाख ३६ हजार रूपयाचे मुद्देमालाचा शोध घेण्यात शिरूर पोलिसांना यश आले असून फिर्यादी यांचे ताब्यात” शिरूर पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगिरी केली आहे
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन ने दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिरूर पोलीस स्टेशन येथे घरफोडी, जबरी चोरी, चोरी यांसारखे गुन्हे दाखल होते. सदर गुन्हयातील आरोपीतांचा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सी सी टी व्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषन यांचे आधारे अज्ञात व सराईत आरोपींचा शोध घेवुन एकुन १८ गुन्हयांमधील चोरी गेलेल्या मालापैकी एकुण साडे सोळा तोळे सोन्याचे दागीने व दिड लाख रूपये रोख रक्कम असा एकुण १२,३६,५००/- रूपयाचे मुद्देमालाचा शोध घेवुन गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आला होता. सदरचा जप्त केलेला मुद्देमाल दिनांक २७ नोव्हेंबर ते दिनांक ०४ डिसेंबर रोजी पर्यत शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या १८ गुन्हयांचे फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदिप गिल , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापु मांगडे, महीला पोलीस अंमलदार अर्चना यादव यांचे पोलीस पथकाने केली आहे


