गुन्हेगारीशिरूर तालुका
घरफोडी करणाऱ्या आरोपीस शिरूर पोलिसांनी केल जेरबंद

शिरूर प्रतिनिधी
घरफोडी करून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम ऐवज चोरी करणा-या चोरटयास शिरूर पोलीसांनी जेरबंद केले असून शिरूर DB पथक व आय कार युनिट यांनी संयुक्त कारवाई केली आहे
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन याबाबत शिरूर पोलीस स्टेशन दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी रामलींग येथील जाधव मळा शिरूर ग्रामीण ता शिरूर जि पुणे येथे फिर्यादीचे राहते घराचा दरवाजाचे कुलुप कोणतरी अज्ञात चोरटयाने तोडुन घरामध्ये प्रवेश करून घराचे बेडरूम मधील लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे चांदीचे व रोख रक्कम असा एकुण २,६०,०००/-रू किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करून चोरून नेला याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे ग गुन्हा दाखल करण्यात आला .
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांना सदर गुन्हयातील चोरट्याचा व गेलेल्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळेयांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्हयातील चोरटयाचा व गेलेला मालाचा सी टी व्ही फुटेज तसेच संदिप चिर्के, आयकार युनिट पुणे ग्रामीण यांचेकडुन तांत्रीक विश्लेषनाचा आधार घेत शोध घेत असताना सदरचा गुन्हा आरोपी नामे प्रकाश विलास गायकवाड. रा रामलिंग रोड शिरूर ता शिरूर जि पुणे यानी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी प्रकाश विलास गायकवाड. रा रामलिंग रोड शिरूर ता शिरूर जि पुणे हा रामलींग ता शिरूर जि पुणे परीसरात असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी सापळा लावुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली होती सदर आरोपीताकडुन पोलीस कोठडीमध्ये केलेल्या तपासामध्ये गुन्हयातील चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी १,१४,९००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदिप गिल , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , यांचे मार्गदर्शनाखाली संदिप चिर्के, कनिष्ठ तज्ञ सहा. पोलीस आयकार युनिट पुणे ग्रामीण, शिरूर पोलीस ठाणे DB पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पोलीस अमंलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.


