राजकीयशिरूर तालुका
माजी नगरसेवक विठ्ठल पवार यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक स्वच्छता आरोग्य समितीचे माजी सभापती शिरूर पंचक्रोशी चे उमद नेतृत्व विठ्ठल पवार यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला

विठ्ठल पवार यांचा मूळ गाव अण्णापूर असून ते अनेक वर्षापासून शिरूर शहरात वास्तव्यात असून शिरूर शहर व पंचक्रोशी मध्ये विठ्ठल पवार हे एक नावाजलेले व उमद व्यक्तिमत्व असून 2016 च्या निवडणुकीत ते गुजर मळा येथून विजयी झाले होते
शिरूर शहराचे नेते व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल पवार यांनी मागील पाच वर्षात शिरूर नगर परिषदेमध्ये चांगले काम करत स्वच्छता आरोग्य विभागाचे सभापती असताना कोरोना काळात त्यांनी चांगले काम केलं त्यामुळे शिरूर नगर परिषदेत स्वच्छता पुरस्कार सुद्धा त्यांच्या काळात मिळाला प्रकाश भाऊ धारीवाल यांचे अत्यंत विश्वास सहकारी म्हणून त्यांना ओळखलं जात आहे
स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्णे यांचे ते कट्टर समर्थक होते बाबूराव पाचर्णे यांच्या आमदारकीच्या काळात अनेक कामे त्यांनी अण्णापूर व रामलिंग परिसरात केली तसेच शिरूर शहरात सुद्धा अनेक प्रश्न मार्गी लावण्यात पाचर्णे यांनी सहकार्य केले पाचर्णे यांचे कट्टर समर्थक असलेले विठ्ठल पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिरूर शहरात एकच
चर्चा सुरु आहे.
स्टेट बँक कॉलनी येथील युवक कार्यकर्ते व पाचर्णे यांचे समर्थक सागर सातारकर यांनी सुद्धा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला


