राजकीयशिरूर तालुका
आमदार असावा तर असा -नागरिकांच्या भावना

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी संपूर्ण प्रत्येक प्रभागात वैयक्तिक भेट देऊन नागरिकांना आपलेच गेले असून त्यांच्या त्यांच्या या आपुलकीच्या भावनेने संपूर्ण शहरात माऊली कटके यांच्या बद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे आमदार असावा तर असा अशी भावना सुद्धा काही नागरिकांनी बोलताना व्यक्त केली

शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण बारा प्रभागात प्रत्येक उमेदवारासाठी आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके स्वतः प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत असून त्यांच्या विचारपूस करत आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहे त्यांनी दाखवलेली हे आपुलकीची व प्रेमाच्या गोष्टीमुळे संपूर्ण शहरात माऊली कटके यांच्या बद्दल एक आदराची भावना निर्माण झाली असून
आमदार असतानाही प्रत्येक नागरिकाचे आपुलकीने तब्येतीची व गोष्टीची चौकशी करत असल्याने नागरिकांना त्यांच्याबद्दल एक आस्था निर्माण झाली आहे


शिरूर नगर परिषद च्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे व प्रभाग क्रमांक दहा मधील रंजन अशोक झांबरे व स्वाती चेतन साठे तिच्या प्रचारार्थ संपूर्ण प्रभाग क्रमांक दहा मध्ये आमदार कटके यांनी प्रचारादरम्यान प्रत्येक नागरिकांची भेट घेतली या गोपाळ वस्ती येथे संपूर्ण गोपाळ समाजाची नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली व अडचणी समजून घेतल्या व पुढील पाच वर्षात आपण काय काम करणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शिरूर शहर साठी भरघोस निधी आणून अनेक विकास कामे आपण मार्गे लावणार असून अनेक योजना लवकरच आपण कार्यान्वित करणार आहोत याचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे व नगरसेवक पदाच्या उमेदवार रंजन झांबरे स्वाती साठे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी माऊली कटके यांनी नागरिकांना केली


