राजकीयशिरूर तालुका

प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे सुनील जाधव व मनीषा कालेवार यांचा जोरदार प्रचार

शिरूर प्रतिनिधी

 शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व प्रभागात प्रचार जोरदार सुरू असून प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुनील जाधव व मनिषा कालेवार यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्व मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आपल्याला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले
शिरूर शहरातील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक तीन मध्ये तिरंगी लढत असून सर्वात महत्त्वाचा प्रभाग म्हणून हा ओळखला जात आहे यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुनील जाधव व मनीषा कालेवार या दोन्ही उमेदवारांनी एकत्रित प्रचार करून सुभाष चौक हलवाई चौक सोनारआळी परिसरात मतदारांना भेटून आपण पाच वर्षात काय काम करणार आहोत हे सांगत विजयी करण्याचे आवाहन केले या पदयात्रेला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार महेंद्र येवले आदी सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध व्यापारी व शिवसेनेचे जुने नेते नेमीचंदभाऊ फुलपगर यांचे या दोन्ही उमेदवारांनी आशीर्वाद घेतले या दोन्ही उमेदवारांना प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत असून या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य दोन तारखेला ईव्हीएम बंद होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button