राजकीयशिरूर तालुका
प्रभाग क्रमांक 12 ब मधून नंदा नानासाहेब जाधव यांनी घेतली प्रचारात आघाडी

प्रतिनिधी शिरूर
शिरूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराची धामधूम सुरू असताना सर्वच उमेदवारांनी आपापले परीने प्रचार सुरू केला आहे शिरूर नगरपालिका प्रभाग क्रमांक बारा ब मधील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवार नंदा नानासाहेब जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून हुडको कॉलनी या प्रभागातून त्यांनी सर्व मतदारांना प्रत्यक्ष भेटून आपण काय काम करणार आहोत या यावर सविस्तर चर्चा केली

हुडको कॉलनी प्रभाग क्रमांक 12 ब या प्रभागातून नंदा नानासाहेब जाधव या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणात उभे असून त्यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे असून हुडको कृती समितीचे अध्यक्ष सुवर्णयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश नानासाहेब जाधव यांच्या त्या मातोश्री असून शैलेश नानासाहेब जाधव 2016 च्या शिरूर नगरपरिषद च्या निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी त्यावेळेस पराभव झाला होता पराभवानंतर सुद्धा शैलेश जाधव यांनी हुडको कॉलनी येथे आपले काम चालू ठेवले

मात्र 2016 ते 2025 या नऊ वर्षाच्या कार्यकालमध्ये शैलेश जाधव यांनी हुडको कॉलनी संपूर्ण परिसर पिंजून काढला कोरोना काळा असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या महिलांसाठी केवायसी असू द्या किंवा हुडको कॉलनीमधील अन्य समस्या असू द्या शैलेश जाधव हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या समस्येचे सोडवली असून आरक्षणामुळे त्यांना या प्रभागात निवडणूक लढवता आली नसली तरी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या या जागेवर जागेवर त्यांनी आपली स्वतःची आई नंदाताई जाधव यांना उमेदवारी म्हणून उभे केली असून त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर हुडको वासियांनी नंदा नानासाहेब जाधव यांना पसंती दिली असून सध्या हुडको कॉलनी मध्ये त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे


