राजकीयशिरूर तालुका
रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात मानसिंग पाचुंदकर यांच्या प्रयत्नामुळे नवीन ट्रांसफार्मर मंजूर
शिरूर प्रतिनिधी
रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात शिरूर आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या प्रयत्नाने नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले असून यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

राज्याचे माजी मंत्री व आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हे ट्रांसफार्मर मंजूर झाले असून यासाठी मानसिंग पाचुंदकर यांनी विशेष प्रयत्न केले होते व या मंजुरीमुळे अनेक गावांचा विजेचा प्रश्न सुटणार असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे
याबाबत मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पुणे जिल्हा DPDC जिल्हा नियोजन व विकास समिती कडून रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील खालील गावांना नवीन ट्रान्सफॉर्मर (DP) मंजूर झालेले आहेत हा निर्णय ग्रामीण भागातील शेतकरी ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे विजेच्या समस्या दूर होऊन कृषी विकासाला गती मिळेल असे पाचुंदकर म्हणाले
मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मर (DP) ची ठिकाणेरांजणगाव, अतिरिक्त संकल्प सिटी डीटीसी मंजूर, रांजणगाव, अतिरिक्त शेळके वस्ती डीटीसी मंजूर, रांजणगाव, अतिरिक्त खेडकर वस्ती डीटीसी मंजूरचिंचोली मोराची पाणी पुरवठा डी टी सी मंजूर, मोराची चिंचोली, गणपत रामभाऊ उकिर्डे डी टी सी साठी अतिरिक्त डीटीसी (मंजूर) वरुडे, अतिरिक्त कालवा डीटीसी (मंजूर),वरुडे, अतिरिक्त शिंदे समूह डीटीसी (मंजूर), वरुडे, अतिरिक्त संतोष भरणे समूह (मंजूर), गणेगाव खा. अतिरिक्त पद्मावती, नवगिरे वस्ती डीटीसी (मंजूर), बुरुंजवाडी, अतिरिक्त पांगारे मळा डीटीसी (मंजूर) आधी गावात ट्रांसफार्मर मंजूर झाले आहेत


