नगरपरिषदेच्या विरोधात उद्या महाविकास आघाडी कडून घंटानाद आंदोलन

शिरूर प्रतिनिधी
शिरुर नगरपरिषदेच्या प्रशासक काळातील मनमानी व गैरप्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या दिनांक 17 रोजी घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष मुज्जफर कुरेशी यांनी दिली
नगरपालिकेतील प्रशासनाच्या चाललेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे हे घंटानात आंदोलन करण्यात येणार असल्याचे मुज्जफर कुरेशी यांनी सांगितले
यावेळी महाविकास आघाडीचे संजय देशमुख ॲडव्होकेट किरण आंबेकर माजी नगरसेवक मंगेश खांडरे हाफिज बागवान राहील शेख कलीम सय्यद युवराज सोनार महिला आघाडीच्या गीताराणी आढाव स्मिता कवाद राणी कर्डिले उपस्थित राहणार आहेत
कुरेशी यांनी सांगितले की शिरुर नगपरिषदेमध्ये गेली ४ वर्षापासून प्रशासक असून शिरुर नगरपरिषदेचे कामकाज मुख्याधिकारी हे एकहाती सांभाळत आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नसल्याने नगरपरिषदेच्या विविध कामांबाबत अंकुश ठेवण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यरत नसल्याने संबंधित मुख्याधिकारी एकाधिकारशाहीप्रमाणे नगरपरिषदेचे कामकाज करत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शिरुर नगरपरिषदेला मंजूर झालेल्या चिंचणी धरण ते शिरुर शहर अंतर्गत नवीन पाईपलाईन योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या अंदाजे ७० कोटी रुपये एवढ्या मोठ्या कामात केवळ प्रशासकीय ताळमेळ नसल्याने आजतागायत पूर्ण झालेली नाही.
शिरुर नगरपरिषद हद्दीमधील गोरगरिब अतिक्रमण धारकांना तातडीने कारवाई करण्यासाठी तत्पर असलेले नगरपरिषद प्रशासन नगरपरिषदेच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत.
शिरुर नगरपरिषदेच्या विविध जागेवर बांधलेल्या संरक्षक भिंती एका महिन्यातच पडझडीला आलेल्या दिसून येत आहे.

नगरपरिषदेचे नगर अभियंता हे विविध कामांसाठी साखळी पध्दतीने ठराविक ठेकेदारांना कामे मिळवून देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या सर्व प्रमुख विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) वतीने बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता शिरुर नगरपालिकेसमोर एक दिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.



