गुन्हेगारीशिरूर तालुका

एम.डी. अंमली पदार्थ बाळगणा-या आरोपीस जेरबंद करण्यात शिरूर पोलिसांना यश

शिरूर प्रतिनिधी

एम.डी. अंमली पदार्थ बाळगणा-या आरोपीस जेरबंद करण्यात शिरूर पोलिसांना यश आले असून या आरोपीकडून एकूण ७२,०००/- रूपयाचा मुद्दे‌माल जप्त करण्यात आला आहे .
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन ने दिलेली माहिती पुढील प्रमाणे
दिनांक १२ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पवन भंडारे रा. वाडा कॉलनी शिरूर ता. शिरूर जि. पुणे हा एम डी नावाचा अंमली पदार्थ विक्री करीता अॅक्टीव्हा स्कुटी गाडी क्रमांक एम एच १२ एम टी ६८३९ यावरून नवीन शिरूर नगरपालीका येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर माहीती ही पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळविल्याने त्यांनी तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस पथक तयार करून सदर ठिकाणी जावुन खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रवाना होवुन मौजे शिरूर ता शिरूर जि पुणे नवीन शिरूर नगरपालीका समोर सापळा लावला असता सदर ठिकाणी अॅक्टीव्हा स्कुटी गाडी क्रमांक एम एच १२ एम टी ६८३९ यावरून एक इसम आला त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने त्याचे नाव पवन सागर भंडारे वय १९ वर्ष रा. वाडा कॉलनी शिरूर ता शिरूर जि पुणे असे सांगितले. सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात २ ग्रॅम ८० मिली पांढरे रंगाचा मॅफेडॉन अंमली पदार्थ प्लास्टीकचे पुडीत मिळुन आला आहे. सदरचा मॅफेडॉन अंमली पदार्थ व अॅक्टीव्हा स्कुटी गाडी एकुण किंमत ७२,०००/- रूपयाचा मुद्देमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने दिनांक १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे करीत आहेत.

 

 

 

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदिप गिल्ल , अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, शिरूर पोलीस स्टेशन डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, पवन तायडे, भाउसाहेब ठोसरे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button