पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

ज्याला दूध पाजलं, तोच डसलाय!” — शिरूर भाजपमध्ये अंतर्गत असंतोषाला उधाण

शिरुर प्रतिनिधी

 

ज्याला दूध पाजलं, तोच डसलाय!” — शिरूर भाजपमध्ये पाचर्णे गटाचा संताप

शिरूर-हवेलीचे माजी आमदार लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांनी पाच वर्षांपूर्वी संकटात सापडलेल्या एका कार्यकर्त्याला मदतीचा हात दिला, राजकारणात संधी दिली. मात्र आज, त्याच कार्यकर्त्याने पाचर्णे कुटुंबीयांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याने, कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “भुकेल्या सापाला दूध पाजलं, आणि तोच आज डसलाय!” — या आशयाची पोस्ट शिरूर तालुका अध्यक्ष पदाच्या निवडीच्या आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

या पोस्टमुळे आधीच भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचे संकेत मिळत होते. त्यातच नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवडीत हवेली तालुक्यात दोन अध्यक्षांची निवड, तर शिरूरमध्ये फक्त एकाच अध्यक्षाची नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. विशेष म्हणजे, शिरूरमध्ये फक्त एकाच व्यक्तीची नियुक्ती झाल्याने या सोशल मीडिया पोस्टला अधिकच बळ मिळालं आहे, आणि ती केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून वास्तवाशी जोडलेली असल्याची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पाचर्णे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर थेट भावना मांडत नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “ज्यांना वाढवलं, सन्मान दिला, त्यांनीच गद्दारी केली,” असे शब्द खुलेपणाने वापरले जात आहेत.

सध्या शिरूर भाजपमध्ये गटबाजी, नाराजी, आणि नेतृत्वाबद्दल असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, याचे पडसाद संघटनात्मक एकतेवर आणि आगामी राजकीय घडामोडींवर निश्चितच उमटण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button