पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर मध्ये माणूस आणि प्रॉपर्टी ‘ या विषयावर व्याख्यान

शिरुर प्रतिनिधी
यशदा मार्फत सातबारा , नकाशा अश्या शब्दांच्या महसूली शब्दकोष तयार करण्यात आला आहे . देशातील सर्व राज्यातील असे महसूली शब्दकोष एकत्रित करुन त्यांचे भाषांतर एकमेकांत केले जात असून आपली वाटचाल ‘वन नेशन वन रेकॉर्ड ‘कडे सुरु असल्याची माहिती यशदा पुणेचे अतिरिक्त संचालक शेखर गायकवाड यांनी दिली .
शिरुर येथे सनशाईन सॅटर डे क्लबचा वतीने गायकवाड यांचे ‘ माणूस आणि प्रॉपर्टी ‘ या विषयावर व्याख्यान झाले .
यावेळी क्लबचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , पोलीस अधीक्षक तथा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नंदकुमार ठाकूर , अतिरिक्त जिल्हाधिकारी स्नेहा किसवे ( देवकाते ) , पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले , तहसिलदार आकाश किसवे , डॉ . गणेश झरेकर ,डॉ .अमित बडवे ,डॉ . रामदास पोटे , डॉ . संदिप कोकरे , लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक , डॉ. दीपक गायकवाड आदी उपस्थित होते .
गायकवाड यांनी शेतीचा शोध , शेती व शेतजमिनीची मालकी याची सविस्तर माहिती दिली . भारत देश स्वतंत्र्य झाला त्यावेळी ३०० प्रकारची विविध वतने होती . आज देवस्थान इनाम एवढेच वतन राहिले आहे .प्रशासन चालविणा-या आधिका-यांना लोकांची भाषा कळली पाहीजे. लोकांची भाषा कळली नाही तर प्रशासनात काम करणे अवघड होईल. कायदा पेक्ष्या माणूस हा किचकट आहे. लोकांमध्ये कायदाचे अज्ञान आहे . भानगडीच्या जमिनी विकणारा नवीन वर्ग तयार होत आहे .देशात ४ .८ कोटी एवढ्या संख्येने जमिनी संदर्भातील प्रकरणे न्यायालयात असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी प्रास्ताविक माजी सनदी आधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले .स्वागत डॉ. संदिप कोकरे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी तर आभार माजी सनदी आधिकारी प्रभाकर गावडे यांनी मानले .


