पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

प्रभु श्री रामलिंग मंदीर २ मे ते ९ मे पर्यंत बंद राहणार

शिरुर ama9

शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेले प्रभु श्री रामलिंग महाराज यांचे मंदीर दिनांक २ मे ते ९ मे पर्यंत बंद राहणार असल्याची माहीती रामलिंग देवस्थानचे खजिनदार पोपटराव दसगुडे यांनी दिली .
यावेळी देवस्थानचे सहसचिव तुळशीराम परदेशी , विश्वस्त गोधाजी घावटे , रावसाहेब घावटे ,वाल्मिकराव कुरुंदळे ,बलदेवसिंग परदेशी ,नामदेव घावटे ,सल्लागार जगन्नाथ पाचर्णे ,बबनराव कर्डिले , दिनकर पाडळे
आदी उपस्थित होते .
दसगुडे यांनी सांगितले सर्व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या पिंडीचे  वज्रलेपाचे काम करण्यात येणार असुन त्या साठी  शुक्रवार दिनांक २ मे ते शुक्रवार ९ मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदीर बंद राहणार आहे असे दसगुडे यांनी सांगितली .
रामलिंग देवस्थानचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योगपती प्रकाशभाउ  धारीवाल यांनी सांगितले कि रामलिंग महाराज यांच्या पिंडीला वज्रलेपाचे काम होणार असुन त्या  साठी  मंदीर त्या काळात बंद राहणार असुन या काळात भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन धारीवाल यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button