पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

शिरुर बस स्थानकातील विविध प्रश्नासंदर्भातील उपोषण लेखी आश्वासना नंतर स्थगित

शिरूर ama9
शिरूर बस स्थानकास दहा बस देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला असून पुढील महिन्यात बस मिळतील यांसह बस स्थानकातील विविध समस्या दहा दिवसांत सोडविल्या जातील याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी सुरू केले बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.
शिरूर बस स्थानकास नवीन बस मिळणे बाबत तसेच बस स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह इतर समस्या सोडवण्यासाठी फुलडाळे यांनी शुक्रवार दि.११ रोजी पासुन उपोषण आंदोलन सुरू केले होते.दरम्यान पुणे जिल्हा विभागीय वाहतुक अधिकारी कमलेश धनराळे,आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,स्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली व पुढील दहा दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर,प्रवासी संघाचे अनिल बांडे,शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संतोष शिंदे, श्रीरामसेनेचे सुनील जाधव , भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार,भाजपा अल्पसंख्यांक अध्यक्ष कोमल भगवे,उपाध्यक्ष सृष्टी करंजुले,शिवसेना महिला शहर प्रमुख सुजाता  पाटील, डॉ.वैशाली साखरे ,भाजपचे सरचिटणीस राजेंद्र महाजन,विजय नर्के , श्रीकृष्ण उद्योगसमुहाचे सागर नरवडे, सावळाराम आवारी,सुधीर कडेकर,आकाश चाकणे,पत्रकार भाऊसाहेब खपके,बबन वाघमारे,सचिन जाधव यांसह उपस्थित होते.
या वेळी देण्यात आलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे कि
पाणपोईसाठी लवकरच दुसरी जागा निश्चित करण्यात येईल.तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचे दहा रांजण ठेवण्यात येतील.
 प्रवेशाचा रस्ता डांबरीकरण करणे तसेच या रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य तत्काळ हलवण्याच्या सुचना विकासक यांना देण्यात येणार.
 शिरूर आगाराला महिनाभरात दहा बस मिळतील
 महिला स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमण्यात येणार तसेच स्वच्छतागृह मोफत असा फलक लावण्यात येईल.
 बाह्य मार्गाने जाणाऱ्या बसेस शिरूर आगारात आणण्याच्या सुचेना देणार
 बस स्थानकात सुरक्षिततेसाठी दोन पाळीमध्ये पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार.
 प्रवेशद्वारात नादुरुस्त बस उभ्या केल्या जाणार नाहीत.
 बस फलाटनुसार लागतील.
 कर्मचारी आराम कक्षाची पाणी करून नियोजन करणार
 बसस्थानकात स्वच्छतेबाबत विकसकास देण्यात येणार.
 नाथजल पाणी बाटली १५ रुपयेलाबाबात स्थानकात स्टिकर लावण्यात येतील
या साठी शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,भाजप,शिवसेना महिला आघाडी यांनीही याबाबत मागणी करुन केला पाठपुरावा.
                 चौकट
लेखी आश्वासनानुसार महिनाभरात दहा व त्यानंतर दहा बस अशा वीस तसेच दहा दिवसांत इतर समस्या सोडविल्या नाही तर पुन्हा उपोषण आंदोलन करणार.
              प्रितेश फुलडाळे
            सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button