पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाउ शेवाळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत

शिरुर ama9
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने जनता दल सेक्यु लरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे सन्मानित करण्यात आले .
जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ यांच्यातर्फे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील आजवरच्या कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. वाय. बी. चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी तेलंगणाचे राज्यपाल महामहीम  जिष्णु देव वर्मा जी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राम शिंदे जी (सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद), डॉ. मुरहरी केळे जी (ज्येष्ठ साहित्यिक, मा. अध्यक्ष, त्रिपुरा राज्य विद्युत मंडळ), आसिफ भामला जी (अध्यक्ष – भामला फाउंडेशन, मुंबई), सागर धापटे पाटील (आयोजक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समिती) आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजेला सुखी करणं हाच राजधर्म मानणाऱ्या मायाळू तरीही कर्तव्यकठोर अशा धुरंधर आणि पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कारित होणे, हे मी माझं मोठं सदभाग्य समजतो. आयुष्यभर आपण ज्या समाजसुधारकांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे, ही मला आजवर मिळालेली सर्वात मोठी पोचपावती आहे.
नाथाभाऊ शेवाळे
(प्रदेशाध्यक्ष- जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button