पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर मधील नैसर्गीक ओढे नाले कुणी गायब केले

शिरुर ama9
शिरुर शहरातील नैसर्गीक ओढे नाले संपुष्टात आले असुन बिल्डर ,अधिकारी व काही राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे हे ओढे नाले या सर्वांनी गिळंकृत केले आहे .
या बाबत माहीती अशी कि शिरुर शहरातील नव्वद च्या दशकात शिरुर शहराचा विकास झालेला नव्हता रांजणगाव औद्यिगीक वसाहती नंतर शहराचा विकास होण्यास सुरवात झाली जागेला भाव येउ लागले शहरातील उपनगरे तसेच आजुबाजुचा परिसर वाढल्याने एक एक इंचासाठी व गुंठ्यासाठी लढाई होउ लागली .
शिरुर शहराचा विकास होत असताना काहींनी आधीच जागा घेउन ठेवल्या त्या जागेशेजारुन अनेक नैसर्गीक ओढे नाले वाहत होते
मात्र बिल्डर व ठेकेदाराच्या लक्षात आल्या नंतर तत्कालीन नगरपरिषदेचे कर्मचारी ,अधिकारी यांना हाताशी धरुन हे नैसर्गीक ओढे नाले ताब्यात त्याच्यावर हक्क सांगत अनेक ओढे नाले दाबले काही ओढे हे छोटे करण्यात आले तर काही ओढे हे पुर्ण पणे ताब्यात घेउन नकाशात हे ओढे दुसरीकडे वळविण्यात आले .
संपुर्ण ओढे हे बिल्डरांनी खाउन टाकले असुन शहरात एक ही नैसर्गीक ओढा नाला शिल्लक राहीला नाही .
शहरातील एका बिल्डरने तर चक्क या ओढ्यात आपली जागा दाखवली असुन शहरात एका शाळे जवळ मध्यवर्ती भागेत हा ओढा होता अनेकांनी पुर्वी हा ओढा पाहीला मात्र तो आज गायब असुन त्या जागेत आता इमारतीसह जागेची विक्री होत आहे .
तर नैसर्गीक ओढे नाले प्रकरणात अनेक राजकिय पदाधिकाऱ्यांनी आपले हात धुउन घेतले त्यांच्या विरोधात आंदोलन करायचे व नंतर गप्प बसायचे त्या मुळे या बिलडरांचे फावत गेले नगरपरिषद कर्मचारी व विभागाचे अधिकारी व राजकिय पदाधिकारी यांच्या या अभद्र युतीमुळे शहराची पुर्ण वाट लागली असुन संपुर्ण व्यवस्था मॅनेज असल्याने यात काही होईल असे वाटत नाही शासनाने वेळेत लक्ष घालुन जर मुळाशी गेल्यास हे ओढे नाले मोकळे होउन श्वास घेउ शकतात तसेच यात अनेक जणांचा सहभाग आढळेल हे मात्र तेवढेच खरे


