पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर स जा तलाठी कार्यालयात कायमस्वरुपी तलाठी द्यावा
शिरुर पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी

शिरुर ama9
नव्वद टक्के तलाठी सजाच्या बाहेर राहतात ह्या मध्ये शिरुर तालुक्याचा समावेश असुन शिरुर शहरातील शिरुर स जा तलाठी कार्यालयात कुणी तलाठी देता का अशी हाक सर्वसामान्य नागरीक मारत आहे .
शिरुर स जा तलाठी कार्यालयात शिरुर ग्रामीण ,अण्णापुर ,शिरुर नगरपालीका ,सरदवाडी कर्डेलवाडी ,गोलेगाव ,तर्डोबाचीवाडी ही गावे येत असुन या गावांच्या सातबारावरील नोंदी ,आठ अ उतारा तसेच फेरफार अशी अनेक कामे असुन
गेल्या तीन ते चार वर्षापासुन या ठिकाणी तलाठी हे पद नियमीत नसुन येथील तलाठ्यांनकडे आमदाबाद ता शिरुर येथील अतिरिक्त पदभार आहे त्या मुळे या ठिकाणी असणारे तलाठी यांना सोमवार ,बुधवार ,शुक्रवार शिरुर मध्ये बाकीचे तीन दिवस आमदाबाद मध्ये काम करावे लागते
परिणामी शिरुर मधील कार्यालय तलाठ्या अभावी बंद राहत त्यात सुट्या ,तहसिल कार्यालयातील मिटिंग ,निवडणुका ,अशी अनेक कामामुळे कार्यालय बंद राहते त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबुन राहत असुन नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत,सातबारा भेटत नाही ,नोंदी पडत नाही ,अनेक नोंदी पेंडीग असुन त्या मुळे शिरुर स जा तलाठी कार्यालय येथे कायमस्वरुपी तलाठी द्यावे हि मागणी पुढे येत असुन लवकरात लवकर कायमस्वरुपी तलाठी न दिल्यास नागरीक आंदोलनाच्या तयारीत आहे


