पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

महाशिवरात्रीनिमित्त रामलिंग येथे यात्रेची तयारी सुरु

तीन दिवस चालणार यात्रा

शिरुर ama9

महाशिवरात्री निमित्त शिरुर पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्री रामलिंग महाराज यांच्या यात्रेची तयारी पुर्ण झाली आहे .
दिनांक २६ रोजी महाशिवरात्री निमित्त शिरुर शहरापासुन तीन कि मी अंतरावर असलेल्या जुने शिरुर (रामलिंग ) रामलिंग महाराज यांचे मंदीर असुन महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते .
प्रसिध्द उद्योगपती स्व . रसिकभाउ धारीवाल यांनी १९७४ साली यात्रेला सुरवात केली या यात्रेचे हे ५१ वे वर्ष असुन या रामलिंग देवस्थांच्या अध्यक्ष पदी प्रसिध्द उद्योग पती प्रकाशभाउ धारीवाल हे आहेत .
यात्रेच्या एक दिवस आधी शिरुर शहरातुन प्रभु श्री रामलिंग महाराजांची पालखी निघते शहरातील शिवसेवा मंदीरातुन या पालखीचे प्रस्थान होते . संपुर्ण शहरात कमानी , पताका ,भगवे झेंडे ,रांगोळ्या असे भक्तिमय वातावरण असते . संपुर्ण शहरातुन पालखीची मिरवणुक निघुन महाशिवरात्रीच्या पहाटे रामलिंग येथे पोहचते त्या नंतर अभिषेक करुन दर्शनासाठी सुरवात होते .
महाशिवरात्रीनिमित्त रामलिंग देवस्थान यात्रा महोत्सव हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असुन दिनांक २० फेबृवारी ते २७ फेबृवारी पर्यंत किर्तन ,काकडा भजन ,हरिपाठ ,हरिजागर असे कार्यक्रम होणार असुन दिनांक २५ रोजी भव्य पालखी मिरवणुक आयोजीत केली असुन शिवसेवा मंडळापासुन या पालखीला सुरवात होणार असुन या पालखी मध्ये सदगुरु चाळीसगाव ,अमर बॅंड बारामती ,सरस्वती बॅंड जालना ,मावळ झांज पथक ,सनई चौघडा वाद्य व आळंदी वारकरी दिंडी सह्भागी होणार आहे .
दिनांक २६ रोजी महाशिवरात्री निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन त्या साठी भाविकांना सुलभ दर्शनासाठी देवस्थानकडुन पुर्ण तयारी झाली असुन यात्रे मध्ये भाविकांना पिण्यासाठी पाणी ,उन्हापासुन  भाविकांना बचाव होण्यासाठी मंडप टाकण्यात आला आहे .
गुरवार दिनांक २७ रोजी भव्य बैल्गाड्यांच्या शर्यती आयोजीत करण्यात आले असुन त्यात प्रथम क्रमांक दोन लाख रुपये असुन या साठी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाशभाउ धारीवाल ,सहचिटणीस तुळशिराम परदेशी ,खजीनदार पोपटराव दसगुडे विश्वस्त गोधाजी घावटे ,रावसाहेब घावटे ,वाल्मिकराव कुरुंदळे ,बलदेवसिंग परदेशी ,नामदेव घावटे सल्लागार जगन्नाथ पाचर्णे ,बबनराव कर्डिले
आदींनी नियोजनासाठी प्रयत्न केले आहे .
तर यात्रेनिमित्त शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतिने विविध उपाययोजना केल्या असुन शिरुर ग्रामीण च्या सरपंच शिल्पा गायकवाड ,उपसरपंच बाबाजी वर्पे ,ग्रामसेवक पोपटराव केदारी यांनी सांगितले कि यात्रेच्या पार्श्वभुमीवर बगाड रोड मुरुमीकरण ,घोटी मळा ते रामलिंग या रस्त्यावर मुरुमीकरण व रोलिंग ,बैलगाडा घाटाजवळ पार्किंग व्यवस्था व लाईट व्यवस्था ,बगाड रोडने एकेरी वाहतुक केली असुन ,रामलिंग रोडची दोन्ही बाजुने साफसफाई केली असुन ,संपुर्ण रस्त्यावर लाईट व्यवस्था केली असुन ,ग्रामपंचायत मार्फत पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था करण्यात आली असुन रामलिंग ते देव्ह्डेश्वर रस्त्यावर मुरुमीकरण करण्यात आले असल्याची माहीती दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button