पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
उद्योगपती स्व रसिकभाउ धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त १२४२ जणांनी केले रक्तदान

शिरुर ama9
रक्तदान हे पवित्र दान असुन या रक्तदानाच्या निमित्ताने स्व रसिकभाउ धारीवाल यांच्या स्मृतीला उजाळा मिळतो रसिकभाउ यांनी तालुक्यात अनेक लोकांच्या वर प्रेम केलेले पाहीले आहे त्यांनी शुन्यात विश्व निर्माण केलेले आपण पाहीले आहे रसिकभाउनवर प्रेम करणारी जनता पाहुन विक्रमी रक्तदान होईल असे मत शिरुर हवेलीचे माजी आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले .
प्रसिध्द उद्योगपती स्व रसिकभाउ धारीवाल यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त श्री प्रकाशभाउ धारीवाल मित्र मंडळ शिरुर शहर व पंच्क्रोशीच्या वतिने भव्य रक्त्दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते शिरुर नगरपरिषदेच्या मंगलकार्यालयात या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराला सकाळेव सात वाजता सुरवात झाली या शिबीराचे उद्घाटन प्रसिध्द उद्योगपती प्रकाशभाउ धारीवाल ,दिनाभाभी धारीवाल ,आदित्य धारीवाल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले
या वेळी माजी आमदार अशोक पवार ,पुणे महानगरपालीकेचे माजी नगरसेवक बाबु वागस्कर ,नाते रक्ताचे राम बांगड ,पंचायत समिती माजी सदस्य आबासाहेब सरोदे रामलिंग चे माजी सरपंच अरुण घावटे ,विठ्ठल घावटे ,नामदेव जाधव , माजी उपनराध्यक्ष जाकीरखान पठाण , माजी नगरसेवक विजय दुगड ,नितीन पाचर्णे ,मंगेश खांडरे ,निलेश गाडेकर ,शिवसेवा मंडळाचे सचिव मनसुख गुगळे आदी उपस्थित होते .
या वेळी मनसे नेते बाबु वागस्कर यांनी रसिकभाउ धारीवाल यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उजाळा देत रसिकभाउ नंतर प्रकाशभाउ व आदित्य बरोबर सुध्दा काम करण्याची संधी मिळत असुन
सात ते आठे वर्ष हे शिबीर आयोजीत केले जात असुन शिरुर शहराला खऱ्या अर्थाने नावारुपाला आणल ते धारीवाल कुटुंबियांनी आणल आहे असे वागस्कर म्हणाले .

संध्याकाळी सात पर्यंत हे रक्त्दान शिबीर चालले असुन यात १२४२
एवढ्या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे सर्वाधीक रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान या वेळी धारीवाल यांच्या हस्ते झाला
सायंकाळी ८६ व्या जयंतीनिमित्त ८६ सायकलच्या वाटपासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला या सायकलचे वाटप ७ मार्च रोजी होणार आहे .

या रक्तदानासठी संजीवनी ब्लड बॅक भोसरी
ओम ब्लड बॅक शिरुर
अर्पन ब्लड बॅक नगर
आचार्य ब्लड बॅक नगर
के ई एम ब्लड बॅक आदींनी सहकार्य केले .
हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे प्रशांत शिंदेतुकाराम खोले ,रविंद्र ढोबळेसंतोष शितोळे ,अभिजीत पाचर्णे ,विट्ठल पवार ,शरद कालेवार,सागर नरवडे सुशांत कुटेविनोद भालेराव निलेश जाधवकिरण बनकर अविनाश जाधव संजय देशमुख ,मुजफ्फर कुरेशी ,एजाज बागवान ,रंजन झांबरे , किरण पठारे ,वसिम सय्यद आदींनी प्रयत्न केले


