पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
मराठा समाजाला (कुणबी) प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष नेमावा
शिरुर तालुका सकल समाजाची मागणी

शिरुर पुढारी
मराठा (कुणबी ) समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावे अशी मागणी शिरुर तालुका सकल मराठा समाजाच्या वतिने आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कडे केली आहे .
या संदर्भातील निवेदन आमदार ज्ञानेश्वर कटके यांना देण्यात आले आहे . या निवेदनात म्हटले आहे कि सकल मराठा समाज शिरुर तालुक्याच्या वतिने आपणास निवेदन देतो कि महाराष्ट सरकारने कुणबी दाखल्यासाठी शिंदे समतीला मुदतवाढ दिली आहे .
मराठा समजातील मुलांना शासकीय कामासाठी लागणारे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेगवेगळी कागदपत्र लागत आहे तसेच ती जमा करुन घेण्यासाठी व प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष व एक कर्मचारी द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतिने करण्यात आली आहे .
या निवेदनावर सुनील जाधव ,रुपेश घाडगे ,स्वप्न्नील रेड्डी ,महेंद्र येवले आदींच्या सह्या आहेत .


