शिरुर मध्ये एक गावठी पिस्तुल व एक काडतुस जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण ची कारवाई १ फेबृवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने गस्त करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे दिपक बबन गुंजाळ रा. गोलेगाव रोड, शिरूर, ता. शिरूर जि. पुणे हा शिरुर बायपास रोडवरील बंद पडलेल्या दि नाना स्पॉट ढाब्या जवळ उभा असून त्यांचे कंबरेला गावठी पिस्टल लावले आहे अशी बातमी मिळालेने स्था.गु.शा.चे पथकाने दोन पंचांसह शिरुर बायपास रोडवर दि नाना स्पॉट ढाबा येथे छापा कारवाई करून इसम दिपक बबन गुंजाळ वय ३२ वर्षे रा. गोलेगाव रोड, शिरूर, ता. शिरूर जि. पुणे याची अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा एकूण ४०,५००/- रू किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. आरोपी दिपक गुंजाळ याचेवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला असुन .त्यास अटक करण्यात आली आहे स्था.गु.शा. व शिरुर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, , पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उपविभाग प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन करत आहे.


