पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन ने प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरींकाना दिली अनोखी भेट

 

शिरुर ama9
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन ने प्रजासत्ताक दिनी नागरींकाना अनोखी भेट दिली असुन विस नागरिकांना त्यांचे चोरीला गेलेले मोबाईल परत केले त्या मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतुन गेले सहा महिन्यात नागरींकाचे मोबाईल चोरी तसेच गव्हाळ झालेले होते त्याचा शोध घेण्याचे आदेश पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथका मधील पोलीस उप निरिक्षक अविनाश थोरात, सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, किशोर शिवणकर, योगेश गुंड यांना दिला होता त्या प्रमाणे पो कॉ उमेश कुतवळ यांनी तांत्रिक विश्लेषनाचे आधारे सुमारे 2,30,000  रु किमतीचे 20 नागरिकांचे मोबाईल चा शोध घेण्यात पोलीसांना यश आले, सदर मोबाईल हे प्रजासत्ताक दिनी नागरीकांना परत करण्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी ठरविले होते, त्याप्रमाणे 20 नागरीकांना त्यांचे 2,30,000  रु किमतीचे मोबाईल त्यांना परत करण्यात आले, मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीसांचे आभार मानले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांच्या  मार्गदर्शना खाली रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागिय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरुर, पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो का उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर, पो हवा ज्ञानेश्वर शिंदे, यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button