शिरुर येथे मकरसंक्राती निमित्त पतंग महोत्सव

शिरुर ama9
संक्रांतीचा सण..बालगोपाळांची उडालेली झुंबड..विविधरंगी पतंगींची आकाशाला गवसणी घालायला लागलेली स्पर्धा..अन नातेसंबंधांचे धागे तुटुन अनाथपण नशिबी आलेल्या त्या बालकांना विश्वास व हिंमत देणारा तो पतंगीचा दोर..निमीत्त होते मकरसंक्रांतीनिमीत्त आयोजित केलेल्या भुमीपुत्र प्रतिष्ठाणच्या पतंग मोहत्सवाचे.
अनाथांची माय पद्मश्री स्व सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयातील मुलांसाठी आयोजित केलेल्या पतंग महोत्सवास आज उस्फूर्त प्रतिसाद लाभला ‘माईनगरी’ या संस्थेच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या या मोहस्तवात पतंग उडविताना ही मुले अक्षरशः हरखुन गेली होती
पंतग उडविताना काटाकाटीवेळी एकच जल्लोष होत होता
भुमीपुत्र प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले
मनशांती छात्रालयाचे व्यवस्थापक विनय सपकाळ यांनी उपस्थितांचे त्रुण व्यक्त केले
या वेळी सागर नरवडे,अविनाश जाधव,योगेश जामदार, यश सूर्यवंशी,सचिन ढोरमले,दिनेश लोखंडे, मिनाक्षी लटांबळे भाऊसाहेब मांदळे, अक्षय खरमाळे, धर्मानंद नितवणे, गणेश शनवारे आदि उपस्थित होते


