पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

शिरुर शहरात *ट्राफीक सिग्नल किंवा स्टाॅपलाईट्स* बसविणेबाबत निवेदन

शिरुर  ama9
शिरुर शहरातील वाढणारी वाहतुक पाहता भविष्यात होणारा धोका लक्षात घेता शहरातील मातोश्री कला क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या वत्तीने शिरुर शहरात *ट्राफीक सिग्नल किंवा स्टाॅपलाईट्स* बसविणेबाबतचे निवेदन शिरुर नगरपरिषदेमधील प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ  यांना देण्यात आले.
 शिरुर शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती रहदारीची समस्या लक्षात घेता,शिरुर शहरातील रस्त्यावर अपघाताची संख्या वाढली आहे. शिरुर शहरातील मुख्य पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर ट्राफिक सिग्नल किंवा स्टाॅपलाईट्स नसल्यामुळे बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढत आहे,परिणामी याचा ञास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे.
शिरुर शहरात,
 १ – बी.जे.काॅर्नर जवळ विद्याधाम शाळा चौक
 २ – इंदिरा गांधी पुतळा चौक
 ३ – कृषी उत्पन्न बाजार समिती गेटच्या समोर
   वरील तीन ठिकाणी लवकरात लवकर ट्राफीक सिग्नल किंवा स्टाॅपलाईट्स बसविण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मातोश्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत आंबेकर,शैलेश जाधव आणि अजिंक्य तारु आदी. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button