पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

शिरुर मध्ये ॲक्टीव्ह गृप च्या वतिने रक्तदान शिबीराचे आयोजन

शिरुर

शिरूर पुढारी येथील ॲक्टिव सोशल महिला ग्रुपचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर व नेत्रतपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ७० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर १०८ जणांची नेत्र तपासणी केली. त्यातील ९ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे. जैन पंचायत भवन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . रक्तांचे नाते पुणे या संघटनेचे रामभाऊ बांगड यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

ॲक्टिव सोशल महिला ग्रुपचा वतीने मागील काही वर्षापासून शिरूर शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबिरात महिला व युवतींनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून मोठ्या संख्येने विविध संस्था संघटना यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन रक्ताचे नाते संघटनेचे रामभाऊ बांगड यांनी केले. त्याच बरोबर शिरूर शहरात ॲक्टिव गृपच्या माध्यमातून महिला भगिनी पुढाकार घेवून दरवर्षी सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करतात हे कौतुकास्पद असल्याचे ही ते म्हणाले. शिबिरासाठी आनंदऋषी ब्लडबँक ,अहिल्या नगर व आनंदऋषी नेत्रपेढी यांचे सहकार्य लाभले. विविध संस्था संघटना यांच्या प्रतिनिधी यांनी शिबिरास भेट दिली.

शिबीर यशस्वी करण्यासाठी ॲक्टिव सोशल ग्रुपचा अध्यक्षा कामिनी बाफना, सुनीता बिहाणी, मंगल संचेती,राणी बोथरा, मनीषा नहार, राखी बोथरा, वंदना भंडारी, रेशया भंडारी, भाग्यश्री शिंगवी, समीक्षा बाफना, सपना बोरा, प्रीती बोरा, मेघा भळगट,रुचीरी बोरा, प्रिया गुंदेचा, अनिता कोठारी, डॉ. सारिका बोरा, संदीप बिहाणी, प्रकाश बाफना, कपिल बोरा, राहुल बोथरा, प्रशांत संचेती, मुन्ना चोरडिया, विकास सुराणा,रुपाली बोरा , रुपाली कर्नावट ,निलम बोथरा  आदींनी विशेष प्रयत्न केले. फोटो ॲक्टीव्ह गृपच्या वतिने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात सहभागी झालेले रक्तदाते व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button