पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर तालुक्यातील गोमातेचे मुख्यमंत्र्यांकडुन पुजन

शिरुर प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले मात्र त्या पुर्वी दिनांक ५ रोजी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या निवासस्थानी गोमातेला दिलेल्या राज्यमातेचा सन्मानपुर्वक अशिर्वाद घेतला.
आमदाबाद ता शिरुर येथुन सकाळी टेंपो ने गोमातेला मुंबई येथे नेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गोमातेचे पुजन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी केले. या कार्यक्रमास शिरुर तालुक्यातील प्रगतशिल शेतकरी भाऊसाहेब माशेरे ,आपल्या गोमातेसह सोसायटीचे चेअरमन आबासाहेब जाधव , नितीन थोरात नितीन माशेरे , वैभव जाधव , अशोक नामदेव माशेरे व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोमातेचे आशीर्वाद घेतले .
आमदाबाद गावच्या गोमातेस मिळालेल्या या सन्मानाचे परिसरातील शेतकरी कौतुक करत आहे .


