गुन्हेगारीपुणे जिल्हाशिरूर तालुका

उद्या शिरुर शहर बंदचे आवाहन

शिरुर प्रतिनिधी

शिरुर शहरातील सर्वात जुने असलेल्या राम मंदीरात  मांसाहाराचे तुकडे आढळल्याने  एकच खळबळ उडाली असुन हि घटना समजल्या नंतर शिरुर शहरातील हिंदु संघटना आक्रमक झाल्या असुन बजरंग दल ,विश्व हिंदु परिषद ,लहुजी शक्ती सेनेच्या
वतिने दिनांक ३ रोजी शिरुर शहर बंदचे आयोजन करण्यात आले आहे .
या संदर्भात विश्व हिंदु परिषद ,लहुजी शक्ती सेना ,सकल हिंदु समाज यांच्या वतिने शिरुर पोलीस स्टेशनला निवेदन दिले असुन त्यात म्हटले आहे कि शिरुर शहरातील प्रसिध्द असलेल्या राम मंदीरा मध्ये  येथे  अज्ञात व्यक्तींनी मंदिर आवारात चिकन आणि मटन पार्टी केलेलं आढळले आहे. या मुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या असुन श्रीराम मंदिर राम आळी या मंदिरात कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने व मंदिराची दुरवस्था असल्याने हा प्रकार घडला. या गोष्टीला श्रीराम मंदिर ट्रस्ट जबाबदार आहे. तरी संबधीत मंदीरात मांसाहार करणाऱ्यानवर  तसेच मंदीराची व्यवस्थीत देखभाल न करणाऱ्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .
या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतिने शिरुर शहर बंद चे आवाहन करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button