गुन्हेगारीपुणे जिल्हाशिरूर तालुका

शिरुर मध्ये अंगठी चोरास शिरुर पोलीसांनी केले जेरबंद

शिरुर पुढारी
शिरुर शहरातील सराफी दुकानातुन सोन्याची  अंगठी चोरणा-या चोरास शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरंबद  केले आहे .
या बाबत शिरुर पोलीसांनी दिलेली माहीती पुढील प्रमाणे दिनांक ११ नोव्हेंबर  रोजी शहरातील  भवरीलाल जुगराज फुलफगर सराफ ॲंन्ड ज्वेलर्स दुकानामधुन फिर्यादी यांची ७०,०००/- रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी कोणीतरी अज्ञात चोरटयाने  चोरून नेल्याची घटना घडल्या नंतर या बाबत शिरूर पोलीस स्टेशन  गुन्हा दाखल झाला .
सदर गुन्हयाचा तपास शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकामधील अंमलदार करीत असताना सदर गुन्हयाचे अनुशंगाने शिरूर शहरामधील सुमारे २५ ते ३० सी सी टी व्ही कॅमे-याची तपासणी करत असताना संशयीत आरोपीने गुन्हा केल्यानंतर एका हॉटेलमध्ये पेटीएम ला ऑनलाईन पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुशंगाने पेटीएम मधुन सदर ऑनलाईन पैसे पाठवलेली माहीती काढता सदरचे पैसे किरण आनंदा नगरे रा बाबुराव नगर, शिरूर ता शिरूर जि पुणे याने पाठवल्याचे समजले.
सदर संशयीत आरोपी बाबुरावनगर, शिरूर येथे राहण्यास असल्याचे समजल्याने त्या ठिकाणी तपास पथकामधील अंमलदार यांनी सापळा लावुन किरण आनंदा नगरे रा बाबुराव नगर, शिरूर ता शिरूर जि पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. सदर गुन्हयात चोरी गेलेली ७०,०००/- रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ही आरोपी याच्या कडुन जप्त करण्यात आली . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले  पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील सहा पोलीस निरीक्षक  हणमंतराव गिरी, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस हवालदार उमेश भगत, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button