पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
शिरुर हवेलीत विधानसभा निवडणुकी मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता
महाविकास आघाडी कडुन आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चीत तर महायुतीकडुन अद्याप उमेदवार जाहीर नाही

शिरुर ama9
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच शिरुर हवेली विधान सभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहु लागले असुन महाविकास आघाडी कडुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार ॲड अशोक पवार यांची उमेदवारी निश्चीत असल्याने त्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे .
मात्र महायुतीकडुन अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने महायुती कडुन कोण असा प्रश्न मतदारांना पडला आहे दोन्ही पक्षाच्या वादात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने युतीच्या कार्यकर्त्यांन मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे .
शिरुर हवेली विधानसभे साठी दुहेरी किंवा तिहेरी लढत होउ शकत .महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे समन्वयक ज्ञानेश्वर कटके हे इच्छुक असुन मात्र हि जागा राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार पक्षाला गेल्याने त्यांना महाविकास आघाडी उमेदवारी मिळने कठीण आहे मात्र त्यांनी कुठल्याही परिस्थिती निवडणुक लढवायची हा चंग बांधल्याने ते अपक्ष कि दुसऱ्या कुठल्या पक्षा कडुन उभे राहतात हे आगामी काळात समजेल
महायुतीतील दुसरा घटक पक्ष भाजप या मतदार संघावर १९९५ पासुन यांचा उमेदवार असुन भाजप तर्फे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदीप कंद यांची उमेदवारी निश्चीत मानली जाते मात्र महायुतीत राष्टवादीच्या प्रवेशामुळे त्यांनी या मतदार संघावर दावा केला आहे त्या मुळे अद्यापपर्यंत या जागेचा प्रश्न सुटला नसुन दोन्ही पक्षाने आपआपला दावा न सोडल्या मुळे भविष्यात कोण उमेदवार असेल हे सांगणे अवघड आहे .
मात्र भाजप कडे हा मतदार संघ गेल्यास तिहेरी लढत अटळ असुन जर मतदार संघ राष्ट्रवादी कडे गेल्यास राष्ट्रवादी कडुन माउली कटके हे उमेदवार असु शकतात असा त्यांच्या समर्थकांनी दावा केला त्या मुळे दुहेरी म्हणजे एकास एक लढत होउ शकते .
येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार काय निर्णय घेतात याकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे .


