पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रचाराला सुरवात

शहरातील पदाधिकारी यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी

शिरुर ama9

राज्याचा  निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच शिरुर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार ॲड अशोक पवार यांची उमेदवारी निश्चीत असल्याने शिरुर शहरातील पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला सुरवात केली असुन त्या मुळे आमदार अशोक पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे .
शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुंभार आळी, ढोर आळी, मुंबई बाजार येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेउन आमदार  अशोक पवार यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहीती देणारे पत्रक या वेळी नागरिकांना देण्यात आले .
शिरूर शहर युवक अध्यक्ष अमित शिर्के , पुणे जिल्हा राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिल शेख , योगेश जामदार ,
शहर युवक उपाध्यक्ष परवेझ शेख, शरद जामदार, आकाश जामदार, चरण जामदार,तेजस जामदार, प्रदीप हांडे आदी  पदाधिकारी उपस्थित होते .
आमदार अशोक पवार यांनी पाच वर्षात मतदार संघात अनेक विकास कामे केले असुन शिरुर शहरात कोट्यावधीची विकास कामे करुन विकासाची गंगा शहरात आणली त्या मुळे शिरुर शहरातील नागरीक व मतदार हे आमदार अशोक पवार यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे चित्र शिरुर शहरात आहे –
अमित शिर्के – शिरुर शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button