पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
राज्यसभेवर खासदार झाल्याबद्दल सुनेत्राताई पवार यांचा सत्कार
शिरुर तालुका व शहर राष्ट्रवादी यांच्या वतिने सत्कार करण्यात आला

शिरुर ama9
सुनेत्राताई अजित पवार यांची राज्यसभेच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल शिरूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुनेत्राताई पवार यांचा सत्कार करण्यात आला या वेळी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष रविंद्र काळे ,शहराध्यक्ष शरद कालेवार, तालुका महिला अध्यक्षा आरती भुजबळ ,महिला शहराध्यक्षा श्रृतिका झांबरे, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक माजी अध्यक्ष कुंडलिक शितोळे ,माजी युवक शहर अध्यक्ष रंजन झांबरे, तालुका विद्यार्थी अध्यक्ष अमित गव्हाणे, राष्ट्रवादी लिगल सेल अध्यक्ष ॲड.अक्षय घावटे पाटील, युवा उद्योजक गणेश शेलार हे उपस्थित होते.
या वेळी सुनेत्राताई पवार यांच्या खासदार होण्या मुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला बळकटी मिळणार असल्याचे मत या वेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली .


