पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर मधुन एक लाखाचे मताधिक्य देउ

जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांची ग्वाही

शिरूर  ama9 
शिरूर लोकसभेत सुमारे ५० हजाराचे मतदान रामोशी बेडर समाजाचे आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला महामंडळांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले आहे.अठरापगड जातींच्या कल्याणासाठी काम करत असताना अधिकृतपणे आमचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.या लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण एकदिलाने काम करणार असून प्रत्येक पदाधिकारी  स्वतंत्रपणे घरोघरी जाऊन प्रचाराचे काम करणार आहे.एक लाखाचे मताधिक्य आम्ही शिरूर लोकसभा निवडणुकीत देऊ
असे मत जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलतनाना शितोळे यांनी व्यक्त केले .
शिरूर येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते .
यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, राष्ट्रवादी शिरुर आंबेगाव तालुका प्रमुख मानसिंग पाचुंदकर, बाजार समिती माजी सभापती शशिकांत दसगुडे, भाजप तालुकाप्रमुख आबासाहेब  सोनवणे राजेंद्र गावडे,शरद कालेवार, महिला आघाडीच्या रेश्मा शेख, प्रिया बिरादार, युवक अध्यक्ष अमोल वर्पे ,किरण जाधव,रेखा जाधव,अविनाश जाधव,केशव लोखंडे, शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात,सुरेश गाडेकर आदी उपस्थित होते.
राजकारण हे भावनेच्या आहारी न जाता विकासाच्या मुद्द्यावर असावं,यंदाची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी असून सर्वांनी एकसंघपणे काम करण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या वेळी  व्यक्त केले.

पुढे बोलताना गावडे म्हणाले की,देशात मोदींचा करिश्मा आहे.त्यांच्या कर्तृत्वाचा डंका इतर देशात आहे.इतर निवडणुकांच्या तुलनेत ही निवडणूक वेगळी असते.कार्यकर्त्यांनी भांबावून न जाता भावनेच्या आहारी न जाता विकासाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी  राहावे.सर्वांनी एकसंघपणे काम करावे.मोठ्या फरकाने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की, जय मल्हार क्रांती संघटनेने राज्यात समाज एकत्र करण्याचे काम केले असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून  महामंडळ स्थापन करण्यात आले. जय मल्हार क्रांती संघटना या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत असून महायुतीच्या उमेदवारामागे समाजाची ताकद उभी आहे.नरेंद्र मोदींनी देशात चांगल्या कामाचा ठसा उमटविला असून शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्व एकत्र काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे, रासपचे शिवाजी कुऱ्हाडे, भाजप ज्येष्ठ नेते धर्मेंद्र खांडरे,राजेंद्र कोरेकर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रविंद्र  काळे आदींची भाषणे झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button