पुणे जिल्हामहाराष्ट्रशिरूर तालुका
रांजणगाव येथे गणेश जयंती निमित्त कार्यक्रम
गणेश जयंती निमित्त मंदीरास आकर्षक फुलांची सजावट

- शिरुर ama9
गणेश जयंती निमित्त रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे माघ गणेशोत्सव २०२४ निमित्ताने शनिवार दि.१० फेबृवारी ते बुधवार दि. १४ फेबृवारी या कालावधीमध्ये धार्मीक व सांस्कृतीक विविध कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले असल्याची माहीती देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली .
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त डॉ. ओमकार देव, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव आदी उपस्थित होते
या वेळी माहीती सांगताना विश्वस्त मंडळाने सांगितले कि मंगळवार गणेश जयंती पहाटे ५ वाजता अभिषेक व सकाळी 7 वाजता गणेश याग देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील व दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांच्या हस्ते झाला . दुपारी १२ वाजता महापूजा धाकटे देव घराणे यांच्या हस्ते झाली त्यानंतर पालखीचे उत्तरद्वार यात्रेकडे प्रस्थान झाले. निनाद शुल्क व भाग्यश्री मंडलिक यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला तसेच श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव यांचा भजनाचा कार्यक्रम तर श्री टिंकु अर्जुनदास रायचंदानी यांचे गणेश भक्तीपर गीते, सायं. ६ वाजता देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. रात्री ९ ते ११ अवधूत चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे गणेश जन्मकीर्तन झाले. बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी स्त्री सुप्त ग्रुप यांचे स्त्रीसुक्त पठण होणार आहे.
तसेच गणेश जयंती निमित्त श्री महागणपती मंदिराला देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.
फोटो गणेश जयंती निमित्त मंदीरास आकर्षक सजावट करण्यात आली


