पुणे जिल्हामहाराष्ट्रराजकीयशिरूर तालुका

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शहरच्या वतिने विविध कार्यक्रम

न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा व हळदी कुंकु कार्यक्रम

शिरुर ama9

शिरुर शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या वतिने न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा तसेच हळदी कुंकु चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती शिरुर शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या अध्यक्षा श्रृतीका  रंजन  झांबरे  यांनी दिली .
या बाबत झांबरे यांनी सांगितले कि न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल कलाकार सह्याद्री मळेगावकर करणार असुन सोबत झी मराठी फेम निवेदिका पुजा थिगळे हे मधुर आवाजाची साथ देणार आहे तसेच हळदी -कुंकु समारंभ होणार असुन या कार्यक्रमाला हायटेक टेक्सटाईल्स पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी  अजितदादा पवार ह्या प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित राहणार आहेत .
ह्या कार्यक्रमासाठी दिनाभाभी धारीवाल ,पुणे जिल्हा राष्टवादी महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे जिल्हा नियोजन समिती सदस्य व तालुका अध्यक्षा रविंद्र काळे ,तालुका महिला अध्यक्षा आरती भुजबळ सह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .
सदर कार्यक्रमासाठी पहिल्या पाच मानाच्या विजेत्यांना फ्रीज व मानाची पैठणी ,एल ई डी व आकर्षक पैठणी ,कुलर व आकर्षक पैठणी ,होम थिएटर व आकर्षक पैठणी ,मिक्सर व आकर्षक पैठणी इ बक्षिसे आहेत .
हा कार्यक्रम गुरुवार दि .१५ फेबृवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रयत शाळेच्या मैदानावर होणार आहे तरी शिरुर शहर व पंचक्रोशीतील महिलांनी या खेळात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन श्रृतीका  रंजन  झांबरे  व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रंजन झांबरे यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button